how to play youtube video without buffering in poor network
YouTube वर व्हिडीओ पाहताना बफर होतो? 'या' ट्रिक्स ठरतील फायदेशीर By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2019 1:08 PM1 / 8YouTube वर अनेक जण आपल्याला हवे असलेले व्हिडीओ पाहत असतात. मात्र अनेकदा मोबाईल नेटवर्क खराब असल्याने व्हिडीओ प्ले होताना अडचणी येत असतात. 2 / 8YouTube वर व्हिडीओ पाहताना बफर होत असेल तर काही ट्रिक्स आहेत ज्याच्या मदतीने युजर्स खराब नेटवर्क असताना देखील आरामात व्हिडीओ पाहू शकतात.3 / 8सर्वप्रथम आपल्या फोनमधील अथवा डेस्कटॉपवरील क्रोम बाऊजरमध्ये जा. मेन्यू ऑप्शनमध्ये देण्यात आलेल्या तीन लाईनवर टॅप करा.4 / 8फोनच्या हिस्ट्रीमध्ये जाऊन क्लियर ब्राऊजिंग डेटावर टॅप करा. डेस्कटॉपवर युट्यूब असेल तर मोर टूल्सवर जाऊन क्लियर ब्राऊजिंग डेटावर टॅप करा. 5 / 8अँड्रॉईड, मॅक, पीसी युजर्स डेटा डिलीट करण्यासाठी टाईम रेंज सिलेक्ट करू शकतात. मात्र आयफोनवर हे उपलब्ध नाही. 6 / 8कूकीज आणि साइट डेटा आणि कॅश्ड इमेज अँड फाईल्सचा ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर क्लियर डेटावर क्लिक करा. 7 / 8व्हिडीओ क्वालिटी बदलण्यासाठी युट्युबच्या खाली देण्यात आलेल्या गियरवर क्लिक करा. 8 / 8व्हिडीओसाठी कमी रेजॉल्यूशन सिलेक्ट करा. त्यानंतर व्हिडीओ पहिल्यापेक्षा अधिक वेगाने प्ले होईल. मात्र डेस्कटॉपसाठी हे फीचर उपलब्ध नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications