शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

iPhone-iPad चा पासवर्ड विसरलात? काही मिनिटांत करा रिसेट, जाणून घ्या सोप्पी पद्धत

By सिद्धेश जाधव | Published: December 17, 2021 1:17 PM

1 / 8
iPhone आणि iPad वरील पासवर्ड रिसेट करणं आता आधीपेक्षा सोप्प झालं आहे. Apple नं नवीन ‘सिक्योरिटी लॉकाआऊट’ फीचर सादर केलं आहे. या नवीन फीचरमुळे आता लॉक्ड iPad किंवा iPhone कंप्यूटरला न जोडता रिसेट करून डेटा डिलीट करता येईल. यासाठी तुमच्या डिवाइसमध्ये iOS 15.2 आणि iPad OS 15.2 असणं आवश्यक आहे.
2 / 8
कंपनीनं नवा अपडेट जारी केला आहे, त्यामुळे लॉक्ड आयफोन किंवा आयपॅडवर चुकीचा पासवर्ड अनेकदा टाकल्यावर नवीन ऑप्शन मिळेल. परंतु डिवाइस रिसेट करण्यासाठी तुमचा डिवाइस वायफाय नेटवर्कशी कनेक्टड आसन आवश्यक आहे.
3 / 8
मॅक किंवा पीसीशी कनेक्ट केल्याशिवाय याआधी आयफोन किंवा आयपॅड रिसेट करता येत नव्हते. नव्या फिचर वापर करून देखील मालकाशिवाय इतर कोणीही आयफोन किंवा आयपॅड रिसेट करू शकणार नाही.
4 / 8
लॉक्ड आयपॅड किंवा आयफोन रिसेट करण्यासाठी अ‍ॅप्पल आयडी तसेच पासवर्ड लक्षात असणे आवश्यक आहे. त्याशिवाय ही पद्धत देखील निकामी ठरू शकते.
5 / 8
अनेकदा चुकीचा पासवर्ड टाकल्यावर सिक्योरिटी लॉकआउट मोड समोर येईल. त्यात Erase iPhone किंवा Erase iPad हा ऑप्शन दिसेल.
6 / 8
Erase iPhone किंवा Erase iPad ऑप्शन निवडल्यानंतर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा अ‍ॅप्पल आयडी आणि पासवर्ड टाकावा लागेल. म्हणजे ते अकॉउंट तुमच्या डिवाइसमधून साइन आउट होईल आणि डिवाइस रिसेट होईल.
7 / 8
सिक्योरिटी लॉकआउट मधील रिसेटचा अर्थ असा कि तुमच्या आयफोन किंवा आयपॅडवरील सर्व डेटा डिलीट होईल. डिवाइस देखील फॅक्ट्री सेटिंग्सवर पुर्वव्रत होईल.
8 / 8
डिवाइसवरील डेटा हवा असेल तर या मोडचा वापर टाळावा. जर तुम्ही वेळावेळी डिवाइस डेटाचा बॅकअप घेत असाल तर या फिचरमुळे तुमचा खूप वेळ वाचेल.
टॅग्स :Apple Incअॅपलtechnologyतंत्रज्ञान