how to save whatsapp status photos and video in your smartphone
WhatsApp स्टेटसमधले फोटो आणि व्हिडीओ सेव्ह करायचेत? कसं ते जाणून घ्या By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 1:06 PM1 / 10स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्राम स्टोरीजप्रमाणे व्हॉट्सअॅपनेही WhatsApp Status हे फीचर आणलं आहे. स्टेटसमध्ये फोटो आणि व्हिडीओ अपलोड केल्यानंतर ते 24 तास असतात. 2 / 10मित्र-मैत्रिणींचं स्टेटस अनेकदा आवडतं किंवा ते सेव्ह करण्याची इच्छा होते. मात्र सेव्ह करण्यासाठी व्हॉट्सअॅपने कोणतही फीचर दिलेलं नाही. फोनमध्ये स्टेटस कसं सेव्ह करायचं हे जाणून घेऊया. 3 / 10सर्वप्रथम प्ले स्टोरवरून फोनमध्ये Google Files अॅप डाऊनलोड करा. 4 / 10अॅप ओपन केल्यावर टॉप राईट कॉर्नरला देण्यात आलेल्या मेन्यू ऑप्शनवर क्लिक करा. 5 / 10Settings ऑप्शनमध्ये जा. Show hidden files ऑन करा.6 / 10 Show hidden files ऑन करा.7 / 10अॅपमध्ये पुन्हा जाऊन खाली देण्यात आलेल्या ब्राऊजरवर टॅप करा. टॅप केल्यावर Internal Storage मध्ये जा. 8 / 10WhatsApp नावाच्या फोल्डरमध्ये जाऊन Media वर क्लिक करा. 9 / 10Statuses असं एक फोल्डर दिसेल. त्यामध्ये आपल्या मित्रमैत्रिणींचे व्हॉट्सअॅप स्टेटस दिसतील. फोटो अथवा व्हिडीओ ओपन करायचा असल्यास नावापुढे डाऊनलोडच्या चिन्हावर क्लिक करा. 10 / 10अनेक ऑप्शन दिसतील. ज्यामध्ये Copy To ऑप्शन सिलेक्ट करा. Internal Storage मध्ये क्लिक करून हवे असलेले फोटो आणि व्हिडीओ फोनमध्ये सेव्ह करा. आणखी वाचा Subscribe to Notifications