शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Happy New Year 2022: WhatsApp वर ग्रुप न बनवता 256 लोकांना एकसाथ द्या New Year च्या शुभेच्छा, वापरा सिक्रेट फिचर

By सिद्धेश जाधव | Published: December 31, 2021 12:06 PM

1 / 7
New Year च्या शुभेच्छा देण्यासाठी WhatsApp चा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. परंतु मित्रपरिवार मोठा असेल तर सर्वांना शुभेच्छा पाठवण्यात दिवस जाऊ शकतो.
2 / 7
WhatsApp वर अनेकांना शुभेच्छा द्यायच्या असतील तर एक अशी पद्धत आहे, ज्यात ग्रुप बनवण्याची गरज नाही. तसेच एक-एक करून मेसेज टाईप किंवा कॉपी पेस्ट करण्याची देखील गरज नाही. या पद्धतीचा वापर करून तुम्ही 256 लोकांना मेसेज पाठवू शकता.
3 / 7
यासाठी WhatsApp वरील Broadcast लिस्ट फिचरचा वापर करावा लागेल. यामुळे तुम्ही शेकडो लोकांना मेसेज पाठवू शकता. एकदा यादी बनवली कि तुम्ही तिचा वापर प्रत्येक सणाला करू शकता.
4 / 7
या फीचरसाठी महत्वाची बाब म्हणजे ज्यांना मेसेज पाठवायचा आहे त्यांच्याकडे तुमचा नंबर कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह केला पाहिजे. ज्यांच्याकडे नंबर सेव्ह असेल त्यांना नेहमीप्रमाणे मेसेज मिळेल.
5 / 7
WhatsApp वर ब्रॉडकास्ट लिस्ट बनवण्यासाठी वर उजवीकडे असलेल्या तीन डॉट मेन्यूवर क्लिक करा. तिथे New Broadcast च्या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर ज्यांना मेसेज पाठवायचा आहे त्या कॉन्टॅक्टची निवड करा आणि खाली असलेल्या हिरव्या टिकवर क्लिक करा.
6 / 7
प्रोसेस पूर्ण झाल्यावर Broadcast लिस्ट ओपन करून मेसेज टाईप करा आणि सेंड आयकॉन वर क्लिक करा. हा मेसेज त्या यादीतील सर्वाना एखाद्या प्रायव्हेट मेसेज प्रमाणे जातो.
7 / 7
तुम्ही या यादीला नाव देखील देऊ शकता. ऑफिस, नातेवाईक, कॉलेज, फॅमिली अश्या वेगवेगळ्या याद्या बनवून त्यांना तुम्ही वेगवेगळे मेसेज पाठवू शकता.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप