how to send whatsapp message without typing know process
तंत्रज्ञानाची कमाल! Whatsapp वर टाईप न करता पाठवता येणार खास मेसेज; जाणून घ्या नेमकं कसं? By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2021 3:20 PM1 / 12व्हॉट्सअॅपचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र अनेकदा व्हॉट्सअॅपवर मेसेज टाईप करायला पुरेसा वेळ नसतो अथवा कंटाळा येतो. मात्र आता अशा युजर्ससाठी एक खूशखबर आहे. कारण आता टाईप न करता देखील खास मेसेज पाठवता येणार आहे. 2 / 12व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. यावेळी देखील असंच एक भन्नाट फीचर आणलं आहे. या फीचरच्या मदतीने युजर्स मेसेज टाईप न करता बिनधास्त पाठवू शकणार आहेत. 3 / 12व्हॉट्सअॅपसोबत इतरही अॅप्समध्ये याचा वापर करता येणार आहे. यामध्ये मोठे मोठे मेसेज टाईप करत बसण्याची गरज नाही. तर फक्त बोलून हे काम सहज होणार आहे. या फीचरमध्ये युजरच्या आवाजानुसार मेसेज टाईप होणार आहे. 4 / 12जो काही संदेश पाठवायचा आहे तो बोलल्यावर आपोआप टाईप होईल, त्यानंतर सेंड बटण डाबून तो समोरच्या व्यक्तीला पाठवता येणार आहे. यासाठी गुगल इंडिक की बोर्ड डाऊनलोड करू शकता. यात हिंदीसह अनेक भाषेला सपोर्ट केला आहे.5 / 12टाईप न करता मेसेज पाठवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला व्हॉट्सअॅप ओपन करावं लागेल. त्यानंतर चॅट वर जा. ज्या व्यक्तीला मेसेज पाठवायचा आहे. त्याचं चॅट ओपन करा.6 / 12मेसेज पाठवण्यासाठी कीबोर्ड ओपन करावा लागेल. जास्तीत जास्त कीबोर्डमध्ये टॉपवर माइक आहे. त्या आयकॉनवर खाली दिलेल्या माइकचे सिम्बॉल आहे. त्यावर टॅप करा.7 / 12व्हॉट्सअॅपमध्ये व्हाईस मेसेज पाठवण्यासाठी माईकचे सिम्बॉल दिले आहे. त्यावर क्लिक करायचं नाही. तुम्हाला फक्त कीबोर्ड ओपन करून त्या माईकवर टॅप करायचं आहे.8 / 12माईक ओपन होईल त्यानंतर तुम्हाला बोलायचे आहे. तुम्ही जे बोलाल ते स्क्रीनवर आपोआप टाईप होईल. पूर्ण मेसेज टाईप झाल्यानंतर माईक आयकॉनवर टॅप करायचं आहे. त्यानंतर फक्त सेंडचं बटण दाबायचं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 9 / 12व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी WhatsApp Mute Video फीचरला अखेर कंपनीने लाँच केलं आहे. याआधी व्हॉट्सअॅपचं हे फीचर टेस्टिंगसाठी बीटा युजर्संसाठी उपलब्ध होते.10 / 12व्हॉट्सअॅपचे लेटेस्ट फीचर्सला ट्रॅक करणाऱ्या ब्लॉग WABetaInfo ने गेल्या महिन्यात या फीचरची माहिती दिली होती. आता फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअॅप कंपनीने ट्विटरवर याची घोषणा केली आहे.11 / 12हे फीचर युजर्सला कोणत्याही व्हिडीओला आपल्या कॉन्टॅक्टसोबत शेअर करण्याआधी म्यूट करू शकतील. नवीन म्यूट व्हिडीओ फीचरमध्ये व्हिडीओ एडिटिंग स्क्रीनवर पाहिले जाऊ शकतो.12 / 12व्हिडीओ एडिट स्क्रीनवर सर्वात वरच्या कोपऱ्यात एक व्हॅल्यूम आयकॉन दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर शेअर केले जाणार आहे. त्यानंतर व्हिडीओ म्यूट होणार आहे. याचा युजर्सना मोठा फायदा होणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications