how to book metro ticket online get driving license and other services on whatsapp
फक्त चॅटिंग किंवा कॉलिंग नाही तर DL, PAN कार्डसह अनेक कामांसाठी होतोय WhatsApp चा वापर! By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 12:09 PM1 / 8सध्या व्हॉट्सअॅपची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात व्हॉट्सअॅपचे करोडो युजर्स आहेत. याचा फायदा सरकार तसेच अनेक खाजगी कंपन्या घेत आहेत. दरम्यान, आम्ही तुम्हाला अशाच काही सेवांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने युजर्स मोबाईलवर सहज मेट्रो तिकीट खरेदी करू शकतात. 2 / 8याचबरोबर घरी किंवा कोणत्याही ठिकाणी असला तरी तुम्हाला व्हॉट्सअॅपवर बिल, मेट्रो तिकीट किंवा पॅनची प्रत किंवा ड्रायव्हिंग लायसन्स सहज मिळू शकते. व्हॉट्सअॅपवर अनेक सरकारी चॅटबॉट्स उपलब्ध आहेत, जे युजर्संना विविध सुविधा देतात. 3 / 8दरम्यान, दिल्ली मेट्रोने आधीच एक सुविधा जारी केली आहे, ज्याद्वारे युजर्स सहजपणे व्हॉट्सअॅपवर तिकीट खरेदी करू शकतात. व्हॉट्सअॅपवर मेट्रो तिकीट बुक करण्यासाठी पहिल्यांदा +91 9650855800 या क्रमांकावर Hi पाठवा. यानंतर तुमची भाषा निवडा, त्यानंतर Buy Ticket चा पर्याय निवडा. त्यानंतर एक नवीन मेसेज येईल, त्यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो उघडेल, ज्यामध्ये युजर्संना त्यांचे स्टेशन निवडावे लागतील. 4 / 8यामध्ये सोर्स आणि डेस्टिनेशन निवडावे लागेल. यानंतर यूजर्सना 1 तिकिटाची रक्कम दिसेल. लक्षात ठेवा व्हॉट्सअॅपच्या मदतीने तुम्ही जास्तीत जास्त 6 तिकिटे खरेदी करू शकता. यानंतर एकूण रक्कम खाली दिसेल, जी तुम्हाला भरावी लागेल. पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला तिकीट मेसेज मिळेल, जो स्कॅन करून तुम्ही मेट्रोमध्ये प्रवेश करू शकता आणि बाहेर पडू शकता.5 / 8याचबरोबर, व्हॉट्सअॅप युजर्स वीज बिल सहज पाहू शकतात. ही फाईल PDF स्वरूपात चॅटवर येते. खरंतर दिल्ली असो की उत्तर प्रदेश किंवा इतर कोणतेही राज्य, लोकांना वीज बिल सहज मिळू शकते. यासाठी तुम्हाला तुमच्या राज्याचे किंवा वीज पुरवठादाराचे नाव माहित असणे आवश्यक आहे. तसेच, तुम्हाला वीज कंपनीला त्यांच्या अधिकृत नंबरवर एक मेसेज पाठवावा लागेल, जो त्यांच्या अधिकृत पेजवर सहजपणे आढळेल. प्रत्येक राज्याची आणि प्रदेशाची प्रक्रिया वेगळी असते.6 / 8व्हॉट्सअॅप युजर्स आपल्या चॅटवर लायसन्स, पॅन कार्ड आणि काही महत्त्वाची कागदपत्रे सहज मिळवू शकतात. यासाठी तुम्हाला +91 9013151515 वर नमस्ते, Hi किंवा Digilocker पाठवावे लागेल. यानंतर युजर्सना तेथून मेसेज मिळेल. या प्रक्रियेत युजर्सना त्यांचा आधार क्रमांक द्यावा लागेल. यानंतर ओटीपी देऊन माहितीची पुष्टी करावी लागेल. 7 / 8यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स निवडावे लागेल. त्यानंतर लायसन्सची PDF फाईल Govt On WhatsApp च्या चॅटवर दिसेल, जी डाउनलोड करून उघडली जाऊ शकते. या प्रक्रियेच्या मदतीने युजर्स पॅन कार्ड देखील डाउनलोड करू शकतात. यासाठी तुम्हाला ते आधी तुमच्या डिजी लॉकरमध्ये अपलोड करावे लागेल.8 / 8दिल्लीच्या डीटीसी बसमधून एका दिवसात कितीतरी लोक प्रवास करत असतात. यासाठी प्रवाशांना प्रत्येक वेळी बसमध्ये असलेल्या कंडक्टरकडून तिकीट काढावे लागते. मात्र, आता व्हॉट्सअॅप युजर्सना हे करण्याची गरज भासणार नाही, कारण लवकरच युजर्सना व्हॉट्सअॅपवरूनच डीटीसी तिकीट बुक करण्याची सुविधा मिळणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications