शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सेलेब्रेटींसारखं गाफील राहू नका, तुमच्या पॅन कार्डवर कोणी कर्ज तर घेतलं नाही ना हे ‘असं’ चेक करा

By सिद्धेश जाधव | Published: April 11, 2022 11:59 AM

1 / 6
PAN कार्डचा वापर फक्त ओळखपत्र म्हणून केला जात नाही तर ते तुमच्या आर्थिक स्थितीची माहिती देतं. त्यामुळेच कर्ज देताना बँकेकडून पॅनची मागणी केली जाते.
2 / 6
अलीकडेच हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता राजकुमार राव याची एक बातमी समोर आली होती. त्याच्या पॅनचा वापर करून एका फिनटेक अ‍ॅपवरून 2,500 रुपयांचं खाजगी कर्ज घेण्यात आलं होतं. आणि हे सर्व अभिनेत्याच्या नकळत घडलं होतं. तसेच Sunny Leone ने देखील अशीच तक्रार काही दिवसांपूर्वी केली होती.
3 / 6
सेलेब्रेटींना जमलं नसेल पण तुम्ही या स्कॅमपासून वाचू शकता. तुमच्या नकळत कोणी तुमच्या पॅनचा वापर करून कर्ज घेतलं असेल तर त्याची माहिती तुम्हाला मिळू शकते. पुढे दिलेल्या पद्धतींचा वापर करून तुम्ही PAN Card चा चुकीचा वापर चेक करू शकता.
4 / 6
CIBIL स्कोरमध्ये तुमच्या पॅन कार्डवरील सर्व कर्जांची माहिती असते. अगदी ईएमआयवर घेतलेल्या मोबाईल, पासून क्रेडिट कार्ड आणि होम लोनची माहिती देखील इथे मिळू शकते. यासाठी तुम्ही CIBIL, Equifax, Experian किंवा CRIF High Mark या ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सचा वापर करू शकता.
5 / 6
Paisa Bazaar, Paytm सारखे फिनटेक प्लॅटफॉर्म्स देखील तुम्हाला तुमचे लोन रेकॉर्ड्स बघता येतील. इथे एखादं तुम्हाला माहित नसलेलं कर्ज प्रकरण दिसल्यास त्याची दखल तुम्हाला घेता येईल.
6 / 6
कोणाशीही तुमच्या पॅनची माहिती शेयर करू नका. पॅनची फोटोकॉपी देत असताना त्यावर आपण ही कॉपी कोणत्या कामासाठी देतोय हे लिहा. त्यामुळे तुमच्या डॉक्युमेंटची सुरक्षा वाढेल. असं तुम्ही आधारकार्ड सोबत देखील करू शकता.
टॅग्स :Pan Cardपॅन कार्डtechnologyतंत्रज्ञान