योग्य एसी कसा निवडाल? १ टन की १.५ टन; सगळेजण हीच मोठी चूक करतात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 11:38 IST
1 / 11उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत, अनेकांना एसी घ्यायची वेळ आली आहे. काहीजण पहिल्यांदाच एसी घेणार आहेत. ज्यांनी घेतलाय त्यानी जी चूक केली ती पुन्हा नव्या लोकांकडून होण्याची शक्यता आहे. 2 / 11कंपनी कोणती निवडायची, किती टनचा एसी निवडायचा, कोणती फिचर्स हवीत, इन्व्हर्टर एसी घ्यायचा की नाही असे अनेक मुद्दे विचारात घ्यायचे असतात. सेल्स पर्सनने सांगितले म्हणून घेतला, मित्राने सांगितले म्हणून घेतला असे म्हणण्यापेक्षा जर तुम्हीच तुमचा होमवर्क केलात तर फायद्यात राहू शकता. 3 / 11तुम्हीच तुमचा होमवर्क का करावा? कारण तुमचा वापर, उद्देश आणि तुमच्या रुमची साईज, तुम्ही एसी लावणार असलेली रुम किती काळ सूर्यप्रकाशात येते आदी अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. नाहीतर एक चूक तुमच्या एसीमुळे वीज बिलात मोठी वाढ करू शकते. तसेच हवी तशी थंड हवा देखील मिळणार नाही. 4 / 11सर्वात पहिला विचार करायचा तो म्हणजे तुमच्या रुमची साईज आणि एसीची कॅपॅसिटी. १ टन, दोन टन, दीड टन किंवा ०.८ टन अशी कॅपॅसिटी असते. 5 / 11क्षमता खूप महत्वाची असते कारण तुम्ही जर कमी क्षमतेचा एसी मोठ्या रुमला निवडला तर त्याच्यावर थंड करण्यासाठी लोड येऊन तो खराब होऊ शकतो, शिवाय बिलही जास्त येते. 6 / 11जर जास्त क्षमतेचा एसी घेतला तरी देखील जास्त वीज वापरून तुम्हाला भलेमोठे बिल येऊ शकते. 7 / 11१ टनाचा एसी १२००० ब्रिटीश थर्मल युनिट्स ची कुलिंग कॅपॅसिटी प्रदान करतो. जो १०० ते १२० स्क्वेअर फुटच्या रुमसाठी योग्य आहे. बेडरुम असेल, ऑफिस केबिन किंवा स्टडी रुम यामध्ये बसतात. 8 / 11हॉलसाठी एसी घ्यायचा असेल तर त्याच्या साईजनुसार दीड किंवा दोन टन एसी घ्यावा. १.५ टन म्हणजे १८००० बीटीयू क्षमता असते. १५० ते २०० स्केअरफुटच्या रुमसाठी या टनाचा एसी वापरू शकता. 9 / 11एसी घेताना जास्त वापर असेल तर इन्व्हर्टर एसी घ्या. जो विजेचा खप कमी करतो आणि लाईट बिलावर जास्त परिणाम होत नाही. इन्वर्टर एसी सामान्य एसीपेक्षा थोडा जास्त महाग असतो. मेन्टेनन्सही महाग जातो. याचा सारासार विचार करून एसी निवडावा.10 / 11स्टार रेटिंगही महत्वाचे असते. १ ते ५ स्टार रेटिंग असते. जेवढे जास्त स्टार तेवढी जास्त वीज बचत असते. इन्व्हर्टर आणि थ्री, फाईव्ह स्टार रेटिंग असेल तर तुमचे वीज बिल कमी येणार. 11 / 11एसीसाठी काही चांगल्या कंपन्या आहेत. यामध्ये डायकेन, हिताची, पॅनासोनिक, ब्लू स्टार, ओ जनरल, कॅरिअर आदी कंपन्यांचे एसी चांगले परफॉर्म करतात.