How to download digital Voter ID card on your smartphone See step by step process digilocker
आपल्या स्मार्टफोनवर कसं डाऊनलोड करू शकाल Voter ID कार्ड; पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2022 2:57 PM1 / 9How to Download Voter ID Card: आधार कार्ड (Aadhaar card), मतदार ओळखपत्र (Voter ID Card) आणि पासपोर्ट (Passport) हे महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहेत. मतदान ओळखपत्र तुम्हाला न केवळ ओळखीचा पुरावा म्हणून वापरता येते, त्याच्या मदतीने तुम्ही मतदानही करू शकता. विधानसभा निवडणूक २०२२ जवळ आली आहे. या शिवाय सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण अनेक डिजिटल गोष्टींकडे वळलो आहोत. 2 / 9दरम्यान, आता तुमचं मतदान ओळखपत्रदेखील डिजिटल झालं आहे. संपूर्ण परिस्थिती लक्षात घेऊन भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) गेल्या वर्षी ई-ईपीआयसी (इलेक्ट्रॉनिक इलेक्टोरल फोटो आयडी कार्ड) कार्यक्रम सुरू केला होता.3 / 9पुढील काही दिवसांत उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा येथे विधानसभा निवडणुका सुरू होत आहे. मतदारांना मतदान प्रक्रियेदरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचं (Social Distancing) पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.4 / 9e-EPIC ही तुमच्या प्रत्यक्ष मतदार ओळखपत्राची पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट (PDF) आवृत्ती आहे जी तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर एका क्लिकने डाउनलोड केली जाऊ शकते.5 / 9मतदार एकतर त्याच्या फोन स्टोरेजमध्ये e-EPIC डाऊनलोड करू शकतो किंवा डिजी लॉकरमध्ये अपलोड करू शकतो. विशेष म्हणजे, मतदार ओळखपत्राची डिजिटल आवृत्ती मतदार ओळखपत्र, पत्त्याचे प्रमाणपत्र किंवा इतर कोणत्याही पडताळणी प्रक्रियेदरम्यान वापरली जाऊ शकते. हे एक सुरक्षित दस्तऐवज आहे आणि हॅकर्स वापरकर्त्यांचे वैयक्तिक तपशील चोरण्यासाठी छेडछाड करू शकत नाहीत किंवा त्याचा वापर करू शकत नाहीत.6 / 9डिजिटल मतदान ओळखपत्र डाऊनलोड करण्यासाठी https://voterportal.eci.gov.in वर जावं लागेल. त्यानंतर त्या ठिकाणी ई-ईपीआयसी ऑप्शनवर क्लिक करा.7 / 9आपला ई-पीआयसी नंबर एन्टर करा आणि नंतर वन टाईप पासवर्ड (OTP) एन्टर करा. हा ओटीपी तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर पाठवला जाईल. यानंतर डाऊनलोड एपिकवर क्लिक करा.8 / 9तुम्हाला तुमचा मोबाइल क्रमांकही रजिस्टर करता येऊ शकतो. तुम्हाला KYC पूर्ण करण्यासाठी ई केव्हायसी ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर फेस लाइव्हनेस व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करा. 9 / 9केव्हायसी पूरअण करण्यासाठी आपला मोबाइल क्रमांक अपडेट करा. केव्हायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आपल्या स्मार्टफोन, लॅपटॉपसारख्या कॅमेरा असलेल्या डिव्हाईसची गरज भासेल. यानंतर तुम्ही ई ईपीआयसी डाऊनलोड करू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications