how to hide Whatsapp chats how to use whatsapp secret code
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 6:49 PM1 / 10इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp वर अनेक फीचर्स मिळतात. काही धमाकेदार फीचर्सबाबत खूप कमी लोकांना माहिती आहे. अशाच एका महत्त्वाच्या फीचरबाबत जाणून घेऊया...2 / 10WhatsApp सिक्रेट कोड हे एक असंच भन्नाट फीचर आहे. ज्याचा वापर करून तुम्ही तुमचं चॅट हाईड म्हणजेच लपवू शकता. सीक्रेट कोडशिवाय कोणीही तुमचं चॅट एक्सेस करू शकणार नाही.3 / 10हे फीचर चॅट लॉकचं एक्सटेंडेड व्हर्जन आहे. ते वापरण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला चॅट लॉक वापरावं लागेल आणि नंतर ते लॉक केलेलं चॅट्स सीक्रेट कोडसह हाईड करावं लागेल. 4 / 10WhatsApp ने गेल्या वर्षी हे फीचर जारी केलं होतं. चॅट लॉक करण्यासाठी, तुम्हाला ते लाँग प्रेस करावं लागेल.5 / 10यानंतर तुम्हाला वरच्या उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या तीन डॉट्सवर क्लिक करावं लागेल. येथे तुम्हाला लॉक चॅटचा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करावं लागेल. 6 / 10आता तुम्हाला Continue वर क्लिक करावं लागेल. यानंतर, फेस लॉक किंवा फिंगरप्रिंट वापरून सिस्टम ऑथेंटिकेशन पूर्ण करावं लागेल. 7 / 10लॉक्ड चॅट बटणावर क्लिक करून तुम्ही हे चॅट्स एक्सेस करू शकता. येथे युजर्सना सीक्रेट कोड सेट करण्याचा पर्याय देखील मिळेल. 8 / 10हा कोड तुमच्या डिव्हाइस पिनपेक्षा वेगळा असेल आणि तुम्हाला तो मॅन्युअली सेट करावा लागेल. सीक्रेट कोड सेट करण्यासाठी, तुम्हाला लॉक केलेल्या चॅट विंडोवर जावे लागेल. 9 / 10यानंतर तुम्हाला सिक्रेट कोडवर क्लिक करावे लागेल. तुम्हाला एक कोड तयार करावा लागेल. हा कोड कोणताही इमोजी, शब्द किंवा नंबर असू शकतो. 10 / 10कोड क्रिएट केल्यानंतर, तुम्हाला OK वर क्लिक करावं लागेल. यानंतर तुम्ही या कोडद्वारेच हाईड केलेलं चॅट शोधू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications