1 / 7कॉल रेकॉर्डिंगचे अनेक फायदे आहेत. अनेकजण वेगवेगळ्या कारणांसाठी याचा वापर करतात. परंतु गैरवापर करणाऱ्यांची संख्या देखील तेवढीच आहे. म्हणूनच लोकांच्या प्रायव्हसी आणि सिक्योरिटीसाठी गुगलनं थर्ड पार्टी अॅपच्या माध्यमातून कॉल रेकॉर्डिंग करण्यावर बंदी घातली आहे. 2 / 7परंतु कॉल रेकॉर्डिंग मात्र करता येत आहे, गुगलनं फोनमधील डिफॉल्ट कॉल रेकॉर्डिंग फीचर बंद केलं नाही. याच्या माध्यमातून समोरची व्यक्ती तुमचा कॉल रेकॉर्ड करत आहे करतेय की नाही हे ओळखण्याची पद्धत आम्ही पुढे सांगितली आहे. 3 / 7कॉल रेकॉर्डिंगची सुरु आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सावध राहावं लागेल. कॉल आल्यावर किंवा कॉल केल्यावर काही गोष्टींवर लक्ष ठेवावं लागेल. अनेक अँड्रॉइड फोनमध्ये असलेल्या डिफॉल्ट फीचरचा वापर करून कॉल रेकॉर्डिंग केली जाते, तेव्हा वारंवार बीपचा आवाज येतो. त्यामुळे कॉल दरम्यान वारंवार बीपचा आवाज आल्यास समोरची व्यक्ती कॉल रेकॉर्ड करत आहे, हे समजून जा. 4 / 7अनेक देशांमध्ये कॉल रेकॉर्डिंगवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मोबाईल बनवणाऱ्या कंपन्या बीप ऑप्शन टाकतात, जेणेकरून रेकॉर्डिंग सुरु असलेलं समजावं. परंतु हे फिचर प्रत्येक फोनमध्ये असेलच असं नाही. 5 / 7कॉल रिसिव्ह होताच बीप आवाज आल्यास देखील कॉल रेकॉर्डिंग सुरु असल्याचं समजून जावं. अनेक फोनमध्ये कॉल रिसिव्ह करताच एक बीप साऊंड येतो जो रेकॉर्डिंगची सूचना देतो. 6 / 7तुमच्या फोन स्क्रीनवर लक्ष ठेवा. जर तुमच्या कमांडविना नोटिफिकेशन बारवर माईक आयकॉन आल्यास समजून जा कि कोणी तरी तुमची हेरगिरी करत आहे आणि तुमचं बोलणं ऐकत आहे. 7 / 7डिफॉल्ट रेकॉर्डिंग ऑप्शनविना स्पिकरवर ठेऊन दुसऱ्या फोनमध्ये रेकॉर्डिंग करता येते. त्यामुळे समोरची व्यक्ती स्पिकर ऑन करून बोलत आहे की नाही त्यावर लक्ष असू दे. स्पिकर ऑन केल्यावर आवाज घुमतो.