Instagram Tips And Tricks : घर बसल्या Instagram वरून करू शकता लाखोंची कमाई; कशी? जाणून घ्या सोपी पद्धत By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 10:10 AM
1 / 7 इंस्टाग्राम (Instagram) काही वर्षांतच प्रचंड लोकप्रिय झाले. फेसबुकनंतर आता याच फोटो शेअरिंग अॅपचा वापर वेगाने वाढत आहे. पण, आता हे केवळ फोटो शेअरिंग अॅप राहिलेले नाही. तर लोकांच्या कमाईचे साधनही झाले आहे. 2 / 7 यावर कुटुंबासोबतचे आणि मित्रांसोबतचे विशेष क्षण शेअर करण्या बरोबरच, आपण बिझनेस प्रमोट करून भरपूर कमाईही करू शकता. आज आम्ही तुम्हाला काही अशा पद्धती सांगणार आहोत, ज्याच्या माध्यमाने आपण घरबसल्या भरपूर पैसे कमवू शकता. 3 / 7 बोलले जाते की, इंस्टाग्रामवर पैसा कमावण्यासाठी अधिक फॉलोअर्सची आवश्यकता असते. मात्र, असे नाही. यूझर्स केवळ क्रिएटर बनूनही एखादा ब्रँड अथवा कंपनीला प्रमोट करूनही पैसे कमवू शकतात. याशिवाय आपण आपल्या प्रोडक्ट्सची इंस्टाग्रामवर विक्री करूनही पैसे कमवू शकता. 4 / 7 सोशल मीडिया इन्फ्लुएंसर हा होणे सर्वोत्तम पर्याय आहे. यामुळे आपल्याला एखाद्या प्रोडक्टची अॅड करण्यासाठी पैसे मिळतात. मात्र, यासाठी आपल्याकडे किमान 5 हजार फॉलोअर्स असणे आवश्यक आहे. यासोबातच एंगेजमेंट रेटही चांगला असायला हवा. आपण ब्रँड्सशी संपर्क साधून स्पॉन्सर पोस्ट करू शकता. 5 / 7 Affiliate Links च्या सहाय्यानेही पैसे कमावले जाऊ शकतात. स्पॉन्सर पोस्टच्या माध्यमाने आपल्याला थेट पैसे मिळतात. पण, Affiliate पोस्टवरच्या बातती, आपण शेअर केलेली लिंक किती लोक क्लिक करून प्रोडक्ट विकत घेतात, यावर सर्व अवलंबून असते. 6 / 7 आपण इन्स्टाग्रामवर ऑनलाइन शॉपिंग पेजही तयार करू शकता. एखाद्या ई-कॉमर्स वेबसाइटप्रमाणे, आपण Instagram वर आपले स्वतःचे पेज तयार करू शकता. येथे यूजर्स प्रोडक्ट्स खरेदी करून ऑनलाइन ऑर्डर करू शकतात. कमाईसाठी हादेखील एक उत्तम पर्याय आहे. 7 / 7 Instagram वर प्रोडक्ट्स इंफो शेअर करूनही पैसे कमावले जाऊ शकतात. आपण एखादा डायट प्रोग्राम शेअर करू शकता. अथवा डेटिंग अॅडव्हाइज देऊ शकता. आपण प्रिमियम इंफो प्रोडक्टच्या माध्यमाने 100 डॉलर पर्यंत करू शकतात. आणखी वाचा