Facebook Money: केवळ स्मार्टफोन-इंटरनेट पुरेसे! फेसबुकवरून करा भरघोस कमाई; पाहा, ‘या’ ५ सोप्या टिप्स By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 9:13 PM
1 / 9 गेल्या काही वर्षांमध्ये तंत्रज्ञानात प्रचंड मोठी उलाढाल झालेली पाहायला मिळत आहे. दर पाच ते सहा महिन्यांनी नवीन तंत्रज्ञान येत असते, असे सांगितले जाते. काही अपवाद वगळता आताच्या जगात स्मार्टफोन जवळपास सर्वांकडे असलेले दिसू शकते. 2 / 9 अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांना याची भूरळ पडलेली आहे. याला जोड म्हणजे सोशल मीडिया. हातातील स्मार्टफोनमुळे केवळ मनोरंजन नाही, तर कोणत्याही व्यक्तीशी संभाषण करणे, संवाद साधणे, अगदी पाहायचे असेल, तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ते शक्य होते. 3 / 9 फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटरपासून ते अनेकविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा आपण वापर करत असतो. आता या प्लॅटफॉर्मचा वापर केवळ फोटो-व्हिडिओ शेअर करण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. हे प्लॅटफॉर्म्स आता पैसा कमवण्याचे देखील मोठे माध्यम आहे. 4 / 9 जगात सर्वाधिक वापरले जाणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Facebook च्या माध्यमातून हजारो लोकं कमाई करत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या तुलनेत फेसबुकवर सर्वाधिक यूजर्स आहेत. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवरून मोठी कमाई करू शकता. 5 / 9 फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही आपले मत, फोटो, व्हिडिओ हे लाखो यूजर्सपर्यंत पोहचवू शकता. YouTube प्रमाणेच फेसबुक देखील आपल्या यूजर्सला व्हिडिओ मॉनिटाइजचा पर्याय उपलब्ध करून देते. जेणेकरून, यूजर्सला पैसे कमवता येतील. तुम्ही फेसबुकवर वेगवेगळ्या टॉपिकवरील व्हिडिओ बनवून शेअर करू शकता. यासाठी तुमचे फेसबुक पेज असणे गरजेचे आहे. 6 / 9 दुसरे म्हणजे फेसबुक पेजवर जास्त फॉलोअर्स अथवा लाइक असतील. अथवा तुम्ही लोकप्रिय असाल तर यातून तुम्ही मोठी कमाई करू शकता. इंफ्लूएन्सर बनून पेड प्रमोशनद्वारे मोठी कमाई केली जाऊ शकते. मात्र, इतर तुमच्या फेसबुक पेजवर जास्तीत जास्त लाइक्स असणे व एंगेजमेंट चांगली असणे गरजेचे आहे. 7 / 9 तुम्हाला जर लिहिण्याची आवड असल्यास ब्लॉगिंगच्या माध्यमातून तुम्ही कमाई करू शकता. Facebook च्या Instant Article फीचरद्वारे कमाई करता येईल. तुम्ही आपल्या पेजवर ब्लॉग्सची लिंक शेअर करून मॉनिटाइज करू शकता. यासाठी तुम्हाला पैसे मिळतील. 8 / 9 याशिवाय, फेसबुकवर लाइव्ह इव्हेंट होस्ट करून देखील कमाई करू शकता. तुम्ही टॉक शो, कॉमेडी शो अथवा इतर टॉपिकवरील इव्हेंट आयोजित करू शकता. हा इव्हेंट अटेंड करणारे यूजर्स तुम्हाला पैसे देतील व तुमची कमाई होईल. तुम्ही अटेंड करणाऱ्या यूजर्ससाठी शुल्क देखील ठरवू शकता. 9 / 9 फेसबुकने आपल्या यूजर्सला प्रोडक्ट सेलिंगचा देखील पर्याय उपलब्ध केला आहे. यूजर्स वस्तूंची विक्री करून मोठी कमाई करू शकतात. याशिवाय हजारो मेंबर्स असलेले काही Facebook Group देखील आहेत, जेथे तुम्ही एफिलिएट लिंक शेअर करून पैसे कमवू शकता. एफिलिएट लिंकच्या माध्यमातून कोणीही वस्तूची खरेदी केल्यास तुम्हाला काही टक्के कमिशन मिळेल. आणखी वाचा