शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नो टेन्शन! डिलीट केलेला WhatsApp मेसेज तुम्हाला वाचायचाय?, 'ही' सोपी ट्रिक करेल मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 2:25 PM

1 / 8
तुम्हाला डिलीट केलेले WhatsApp मेसेज देखील वाचायचे असतील तर तुम्ही आता डिलीट केलेले WhatsApp मेसेज सहज वाचू शकता.
2 / 8
WhatsApp वर डिलीट फॉर एव्हरीवन नावाचे फीचर येतं. या फीचरच्या मदतीने तुम्ही पाठवलेला मेसेज डिलीट करू शकता.
3 / 8
या फीचरनंतर अनेक लोक मेसेज पाठवतात आणि ठराविक वेळेत डिलीट करतात. असं केल्याने काही युजर्स नाराज होतात.
4 / 8
डिलीट केलेल्या मेसेजमध्ये काय होते हे जाणून घेण्याची त्यांची खूप इच्छा आहे. जर तुम्हीही अशा लोकांमध्ये असाल तर तुम्हाला डिलीट केलेल्या मेसेजबद्दल अगदी सहज माहिती मिळेल.
5 / 8
यासाठी तुम्हाला फोनमध्ये असलेली एक सेटींग ऑन करावी लागेल. तुम्हाला तुमच्या फोनमध्ये नोटिफिकेशन्स हिस्ट्री ऑन करावी लागेल. ज्यामुळे तुम्हाला सर्व माहिती मिळेल.
6 / 8
अशा परिस्थितीत, एखादा WhatsApp मेसेज पाठवल्यानंतर तो डिलीट केला तरी तुम्ही तो नोटिफिकेशन हिस्ट्रीमध्ये वाचू शकता.
7 / 8
लक्षात ठेवा की, तुम्ही नोटिफिकेशन हिस्ट्रीमध्ये कोणताही ऑडिओ मेसेज, व्हिडीओ किंवा फोटो ऍक्सेस करू शकणार नाही. तुम्ही फक्त मेसेज वाचू शकता.
8 / 8
तुम्ही नोटिफिकेशन बारमधून थेट हिस्ट्रीवर जाऊ शकता किंवा सेटिंग्जमध्ये हा ऑप्शन ओपन करू शकता. येथे तुम्हाला २४ तासांपर्यंतची हिस्ट्री मिळेल.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान