शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मस्तच! आता WhatsApp वर सहज रेकॉर्ड करता येणार Video कॉल; जाणून घ्या, नेमकं कसं?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 3:22 PM

1 / 10
WhatsApp हे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग एप्सपैकी एक आहे. WhatsApp च्या माध्यमातून युजर्स केवळ मेसेजच पाठवू शकत नाहीत तर ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलही करू शकतात. मात्र युजर्स व्हिडीओ कॉल रेकॉर्ड करू शकत नाहीत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका ट्रिकबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही सहज WhatsApp कॉल रेकॉर्ड करू शकता.
2 / 10
विशेष म्हणजे तुम्ही तुमच्या अँड्रॉईड किंवा आयफोन या दोन्ही उपकरणांमध्ये WhatsApp व्हिडीओ रेकॉर्ड करू शकता. WhatsApp व्हिडिओ कॉल डाऊनलोड करण्यासाठी, तुम्हाला फक्त XRecorder हे एप डाऊनलोड करावे लागणार आहे. WhatsApp हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे.
3 / 10
सर्वप्रथम तुमच्या अँड्रॉईड फोनवर गुगल प्ले स्टोअर ओपन करा. यानंतर येथे XRecorder एप डाऊनलोड करा. यानंतर, आवश्यक परमीशन देऊन पुढे जा. आता तुम्हाला स्क्रीनवर रेकॉर्डिंगचा पर्याय मिळेल. येथून तुम्ही व्हिडीओ कॉल रेकॉर्ड करू शकता.
4 / 10
सर्वप्रथम, ज्या युजर्सचा कॉल तुम्हाला रेकॉर्ड करायचा आहे, त्याला WhatsApp वर व्हिडीओ कॉल करा, त्यानंतर तळाशी असलेले स्वाइप बटण दाबा. येथे सेटिंगमध्ये जाऊन 'कंट्रोल सेंटर' वर जा. येथे तुम्हाला तुमची स्क्रीन रेकॉर्ड करण्याचा पर्याय दिसेल. आता त्यावर क्लिक करा. तुम्ही त्यावर क्लिक करताच, तुमच्या डिव्हाइसवर WhatsApp कॉल रेकॉर्डिंग सुरू होईल.
5 / 10
इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मने आपल्या युजर्ससाठी कॅप्शन मोड जारी केला आहे. सध्या ते डेस्कटॉप बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध आहे. युजर्स या फीचरद्वारे डॉक्युमेंट, जीआयएफ, फोटो आणि व्हिडीओ पाठवू शकतील तसेच त्यात कॅप्शन जोडू शकतील. कंपनी सध्या या फीचरची चाचणी करत आहे.
6 / 10
WhatsApp आपल्या डेस्कटॉप युजर्ससाठी एक नवीन फीचर आणणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी सध्या या फीचरवर काम करत आहे. या फीचरला स्क्रीन लॉक म्हणतात, हे फीचर प्रत्येक वेळी युजर्स एप्लिकेशन ओपन करेल तेव्हा पासवर्ड विचारेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
7 / 10
गेल्या अनेक दिवसांपासून Whatsapp पोल फीचरची चर्चा सुरू होती, मात्र आता ते रोलआउट करण्यात आलं आहे. Whatsapp या फीचरची अनेक दिवसांपासून चाचणी करत होतं आणि आता ते लाईव्ह करण्यात आलं आहे. त्यामुळे युजर्स Whatsapp वरही पोल तयार करू शकतील. हे फीचर फेसबुक आणि ट्विटरवर चालतं तसंच काम करेल.
8 / 10
तुम्ही फेसबुक आणि ट्विटरवर कधी पोल तयार केला असेल तर तुम्हाला त्याबद्दल माहिती असेलच. जर तुम्ही तसे केले नसेल तर पोल फीचरद्वारे तुम्ही तुमच्या फ्रेंड लिस्टमध्ये उपस्थित असलेल्या मित्रांना काही प्रश्न विचारू शकता आणि त्यांना उत्तर देण्यासाठी काही पर्याय देऊ शकता. Whatsapp ने हे फीचर अँड्रॉईड आणि आयओएस दोन्हीसाठी आणले आहे.
9 / 10
तुम्ही Whatsapp चे पोल फीचर एकाच चॅट बॉक्समध्ये आणि ग्रुप चॅटमध्येही वापरू शकता. गेल्या अनेक दिवसांपासून Whatsapp पोल फीचरची चर्चा सुरू होती, मात्र आता ते रोलआउट करण्यात आलं आहे. Whatsapp या फीचरची अनेक दिवसांपासून चाचणी करत होतं आणि आता ते लाईव्ह करण्यात आलं आहे. त्यामुळे युजर्स Whatsapp वरही पोल तयार करू शकतील. हे फीचर फेसबुक आणि ट्विटरवर चालतं तसंच काम करेल.
10 / 10
तुम्ही फेसबुक आणि ट्विटरवर कधी पोल तयार केला असेल तर तुम्हाला त्याबद्दल माहिती असेलच. जर तुम्ही तसे केले नसेल तर पोल फीचरद्वारे तुम्ही तुमच्या फ्रेंड लिस्टमध्ये उपस्थित असलेल्या मित्रांना काही प्रश्न विचारू शकता आणि त्यांना उत्तर देण्यासाठी काही पर्याय देऊ शकता. Whatsapp ने हे फीचर अँड्रॉईड आणि आयओएस दोन्हीसाठी आणले आहे. तुम्ही Whatsapp चे पोल फीचर एकाच चॅट बॉक्समध्ये आणि ग्रुप चॅटमध्येही वापरू शकता.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान