शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दिवसभर डेटा पुरत नाही? मग या स्मार्टफोन ट्रिक्स मिळवून देतील तुमचा वाया जाणारा मोबाईल डेटा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 6:45 PM

1 / 7
गेल्यावर्षीच्या अखेरीस टेलिकॉम कंपन्यांनी मिळून ग्राहकांना धक्का दिला. त्यामुळे इंटरनेट डेटामधील एका एका केबीला महत्व आलं आहे. अशात जर तुमचा स्मार्टफोनच तुमचा डेटा वाया घालवत असेल तर काय करावं, हे जाणून घ्या.
2 / 7
काही ट्रिक्स आणि सेटिंगमध्ये बदल करून तुमचा डेटा वाचवता येतो. त्यामुळे मधेच डेटा संपून तुमचं काम अर्धवट रहाणार नाही. पुढे आम्ही अशाच टिप्स आणि ट्रिक्सची माहिती दिली आहे.
3 / 7
तुम्ही तुमच्या स्मार्टफोनला डेटा लिमिट सेट करू शकता. म्हणजे तुम्ही सेट केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त डेटा वापरला जाणार नाही.
4 / 7
सेटिंगमध्ये जाऊन डेटा युजेस चेक केल्यावर तुम्हाला जे अ‍ॅप्स जास्त डेटा वापरतात त्यांची माहिती मिळेल. असे अ‍ॅप्स तुम्ही गरज नसताना फोर्स स्टॉप करून ठेऊ शकता. त्यामुळे तुमचा डेटा वापर कमी होईल.
5 / 7
स्मार्टफोन मधील डेटा सेव्हर मोडचं कामच तुमचा मोबाईल डेटा वाचवणं हे आहे. या मोडमध्ये अनावश्यक आणि बॅकग्राऊंड डेटा युजेस कमी केला जातो. परिणामी आवश्यक कामासाठी पुरेसा डेटा शिल्लक राहतो.
6 / 7
तुमच्या स्मार्टफोन बॅकग्राऊंड सिंक आणि जीपीएस लोकेशन अशा सेवा चालू असतात आणि त्या डेटा देखील वापरतात. या सेवा बंद केल्यास तुमचा डेटा तुमच्या कामासाठी तुम्हाला मिळू शकतो.
7 / 7
हेवी युजसाठी वाय-फायचा वापर करता येऊ शकतो. मूवी डाउनलोड करणं, मोठ्या फाईल्स डाउनलोड करणं, ऑपरेटिंग सिस्टम किंवा अ‍ॅप्स अपडेट करण्यासाठी तुम्ही वाय-फायचा वापरू शकता. त्यामुळे तुमचा मोबाईल डेटावरील ताण कमी होतो.
टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान