शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आता घरबसल्या मोबाईलवर सर्व टीव्ही चॅनल्स पाहा एकदम Free; Jio ने आणली नवीन ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 11:47 AM

1 / 8
Watch free channels on Jio TV: टेलिव्हिजन पाहण्याची पद्धत सतत बदलत असते. पूर्वी लोक केबल कनेक्शनद्वारे टीव्ही पाहत असत, आता त्याची जागा डायरेक्ट टू होम (डीटीएच) सेवेने घेतली आहे. पण आता पुन्हा काळ बदलला आहे आणि आता लोकांनी मनोरंजनासाठी नेटफ्लिक्स, अॅमेझॉन सारख्या OTT प्लॅटफॉर्मचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.
2 / 8
त्याचवेळी, आता यूझर्सना टीव्ही चॅनेल पाहण्यासाठी केबल कनेक्शन किंवा डीटीएचची आवश्यकता नाही. यूझर्स एकही पैसा खर्च न करता सर्व टीव्ही चॅनेल मोबाईलवर पूर्णपणे विनामूल्य पाहू शकतात. रिलायन्स जिओनं आपल्या यूझर्ससाठी ही खास ऑफर आणली आहे.
3 / 8
रिलायन्स जिओ यूजर्स कंपनीच्या या ऑफरचा फायदा घेऊ शकतात. महत्वाची गोष्ट म्हणजे जुन्या चॅनेलशिवाय तुम्ही नवीन चॅनेलही पाहू शकता, तेही अगदी मोफत. याशिवाय तुम्ही न्यूज चॅनेलही मोफत पाहू शकता. हे सर्व चॅनेल पाहण्यासाठी तुम्हाला कोणतेही वेगळे शुल्क द्यावे लागणार नाही. यूझर्सना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की जिओची ही सेवा केवळ त्यांच्या यूझर्ससाठी आहे.
4 / 8
तुम्ही जिओ यूजर असाल तर तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता. जिओचा नंबर वापरणारे त्यांच्या स्मार्टफोनवर २०० हून अधिक एचडी चॅनेलसह ९५० हून अधिक टीव्ही चॅनेल पाहू शकतात.
5 / 8
कंपनी कोणत्याहीवेळी हे चॅनेल पाहण्याची सुविधा देते. यूझर्स एचडी चॅनेलवर चित्रपट, खेळ, क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, बातम्या पाहू शकतात. कंपनी १५ पेक्षा जास्त भाषांमध्ये टीव्ही चॅनेल ऑफर करते.
6 / 8
मोफत टीव्ही चॅनेल पाहण्यासाठी तुम्हाला वेगळे रिचार्ज करण्याची गरज नाही. यासाठी तुम्हाला फक्त माय जिओ अॅप स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल करावे लागेल. तुम्ही कोणतेही टीव्ही चॅनल पहा, त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, परंतु डेटा नक्कीच खर्च होईल.
7 / 8
युजर्सना मोफत टीव्ही चॅनेल पाहण्यासाठी इंटरनेट सुविधा असली पाहिजे, तरच तुम्ही तुमचे आवडते चॅनेल मोफत पाहू शकाल.
8 / 8
जिओवर उपलब्ध असलेले टीव्ही चॅनेल पाहण्यासाठी जिओ टीव्ही अॅपची मदत घ्यावी लागेल. या अॅपवर तुम्ही विविध प्रकारचे टीव्ही चॅनेल पाहू शकाल. यातील काही सशुल्क चॅनेल आहेत ज्यासाठी वापरकर्त्यांना शुल्क द्यावे लागेल. तुम्हाला लाइव्ह चॅनेल मोफत पाहण्याचा आनंद घ्यायचा असेल, तर वर नमूद केलेली पद्धत नक्कीच वापरून पाहा.
टॅग्स :Jioजिओ