शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जुन्या Android फोनमधून नव्या फोनमध्ये Contacts असे करा ट्रान्सफर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 3:59 PM

1 / 9
नव्या स्मार्टफोनची खरेदी केल्यावर जुन्या फोनमधील महत्त्वाचा डेटा नव्या फोनमध्ये ट्रान्सफर करतो. प्ले स्टोरवर अनेक अ‍ॅप उपलब्ध आहेत ज्यांच्या मदतीने आपण डेटाचा बॅकअप घेऊ शकतो. मात्र यामध्ये Contacts डिलीट होण्याची शक्यता असते. जुन्या Android फोनमधून नव्या फोनमध्ये Contacts कसे ट्रान्सफर करायचे हे जाणून घेऊया.
2 / 9
सर्वप्रथम Android स्मार्टफोनच्या सेटींगमध्ये जा. सेटींगमध्ये गेल्यावर Accounts चा पर्याय मिळेल त्यावर क्लिक करा.
3 / 9
Google अकाऊंटचा आणखी एक पर्याय मिळेल त्यावर क्लिक करा.
4 / 9
क्लिक केल्यावर Account Syncing चा पर्याय मिळेल त्यावर क्लिक करा.
5 / 9
अनेक पर्याय समोर दिसतील त्यातील कॉन्टॅक्ट्स (Contacts) च्या पर्याय दिसेल. तो ऑन करा.
6 / 9
वरच्या बाजूला उडव्या कोपऱ्यात तीन डॉट दिसतील. त्यातील Sync वर क्लिक करा. असं केल्यास सर्व कॉन्टॅक्ट हे गुगलच्या सर्व्हरवर Sync म्हणजेच अपलोड होतील.
7 / 9
तुमच्या नव्या Android Smartphone मधील सेटींगमध्ये जा. त्यातील अकाऊंट पर्यायावर क्लिक करा.
8 / 9
Add Account वर जाऊन ते गुगल अकाऊंटला जोडा.
9 / 9
नव्या स्मार्टफोनमध्ये जुन्या स्मार्टफोनमधील गुगल अकाऊंटवरून लॉग इन करणं गरजेचं आहे. अकाऊंट लॉग इन केल्यानंतर सर्व Contacts नव्या फोनमध्ये Sync होतील.
टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान