how to unlock your android smartphone in 2 minutes if it gets locked
स्मार्टफोन लॉक झालाय? मग 'असा' करा अनलॉक By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 3:18 PM1 / 8स्मार्टफोन हा अत्यंत महत्त्वाचा असल्याने अनेक युजर्स आपल्या फोनमधील डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी तो लॉक करतात. फोनमधील महत्त्वाचे मेसेज, फोटो आणि व्हिडीओ अपल्या व्यतिरिक्त कोणी पाहू नये यासाठी फोन आवर्जून लॉक केला जातो. फोन लॉक करण्यासाठी पॅटर्न लॉक अथवा पासवर्डचा वापर केला जातो. कधी कधी हा पासवर्ड विसरला जातो किंवा कोणी तरी तो बदलतं अशावेळी अगदी सहज स्मार्टफोन कसा अनलोक करायचा हे जाणून घेऊया.2 / 8सर्वप्रथम स्मार्टफोन स्विच ऑफ करा. तुम्ही फोनचा लॉक पॅटर्न विसरला असाल तर फोनची बॅटरी बाहेर काढून तो स्विच ऑफ करा.3 / 8सध्या बाजारात नॉन रीमुवल बॅटरी असलेले स्मार्टफोन उपलब्ध आहेत. तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी नॉन रीमुवल असेल तर व्हॉल्यूम बटण आणि पॉवर बटणला 10 सेकंद प्रेस करा.4 / 8बटण प्रेस केल्यास फोन रिस्टार्ट होईल फोन ऑन झाल्यानंतर डिवाईसच्या व्हॉल्यूम बटणाचा वरचा भाग, तसेच त्यासोबतच फोनचं होम आणि पॉवर बटण एक साथ दाबा. 5 / 8रिकव्हरी मोडमध्ये जोपर्यंत फोन येत नाही तोपर्यंत बटण दाबा. फोन रिकव्हरी मोडमध्ये गेल्यानंतर अँड्रॉईडचा लोगो दिसेल त्यानंतरच फोनच पॉवर बटण दाबा.6 / 8यानंतर तुम्हाला reboot system now, apply update from sdcard, apply update from ADB, wipe data/factory reset, wipe cache partition असे पर्याय दिसतील त्यानंतर wipe data/factory reset वर क्लिक करा. क्लिक केल्यावर आणखी काही पर्याय मिळतील.7 / 8तुम्हाला यामध्ये Confirm wipe of all user data? हा पर्याय दिसेल. त्यानंतर Yes > Erase Everything वर क्लिक करा. Yes-Delete all user यासारखा एक पर्याय दिला जाईल त्यावर क्लिक करताच फोनच लॉक ओपन होईल.8 / 8लॉक झालेला स्मार्टफोन अनलॉक करण्यासाठी या पद्धतीचा वापर केल्यास फोनमधील सगळा डेटा मात्र डिलीट होईल. आणखी वाचा Subscribe to Notifications