शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

वीज वाचविण्याचे एकसोएक उपाय, बिलावरही मोठा फरक पडेल, एकदा करून बघाच...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 3:02 PM

1 / 8
आजकाल वीज बिले मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत. ० ते १०० नंतर थेट १०१ ते ३०० युनिटचाच स्लॅब आहे. यामुळे १०० युनिटचा आकडा मीटरने ओलांडला की दीड हजाराच्या आसपास बिल आलेच म्हणून समजा. वन बीएचके फ्लॅटधारकांचेही बिल आता १२०० ते १५०० रुपये येऊ लागले आहे.
2 / 8
मीटर फास्ट पळतायत की अन्य काही हे कोणाला समजायलाच मार्ग नाहीय. असे असताना तुम्हीच तुमच्या वापरावर नियंत्रण ठेवले तर... वीजही वाचवता येईल आणि पैसेही...
3 / 8
जेव्हा जेव्हा खोली सोडण्याची वेळ येते तेव्हा विद्युत उपकरणे बंद करण्यास विसरू नका. वापरात नसताना वाहनांची इंजिने आणि विद्युत उपकरणे बंद करा.
4 / 8
वीज वाचविण्याचे पहिले पाऊल म्हणजे योग्य उपकरणांची निवड करणे. इन्व्हर्टर टेक्नॉलॉजी असलेली उपकरणे हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. कारण ते ऊर्जेचा वापर कमी करतात आणि विजेचा अपव्यय टाळतात.
5 / 8
ज्याप्रमाणे इंजिनला वेळोवेळी मेंटेनन्सची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे लाईट सेटअप देखील तपासावा लागतो. परंतू, बरीच वर्षे आपण ते तपासत नाही. मग कुठे वायर शॉर्ट असते, कुठे उपकरण जुने झाल्याने वीज खात असते. असे प्रकार हळू हळू मीटर पळवायला लागतात.
6 / 8
सौर पॅनेल वापरून घरे आणि कार्यालयांना वीज पुरवठा केला जाऊ शकतो. जर तुमच्याकडे गार्डन आहे. टेरेस आहे किंवा घराबाहेर रात्रीच्या वेळी लाईट लावायच्या असतील तेव्हा तुम्ही सौर उर्जेवरील लाईट वापरू शकता. यामुळे तुम्हाला वीज कमी लागेल.
7 / 8
वीज वाचविण्यासाठी उपकरणांची काळजी घेणे आवश्यक आहे. अनेक उपकरणांची ऑन-ऑफ सायकल असते. यामुळे ही उपकरणे वेळोवेळी तपासून घ्यावीत. एसी, फ्रिजचे कॉम्प्रेसर, गॅस आदी गोष्टी तपासाव्यात, जेणेकरून ते थंड करण्यासाठी जास्त वीज खर्च करणार नाहीत.
8 / 8
तुमच्या उर्जेच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपकरणे विनाकारण चालू ठेवणे, बंद करायचा कंटाळा करणे असे प्रकार करू नका. यामुळे मीटरमधील युनिट वाढतात आणि १०० चा आकडा गाठला की वेगळा दर आणि कर चालू होतो.
टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण