How WhatsApp’s multi-device support may work on Android rkp
WhatsApp मध्ये येतंय Link Device चं फीचर, असं करेल काम... By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2020 7:55 PM1 / 7WhatsApp लवकरच एक महत्वपूर्ण फीचर लाँच करण्याच्या तयारीत आहे. या फीचरच्या माध्यमातून एका WhatsApp अकाऊंटला मल्टिपल डिव्हाईसला लिंक करता येऊ शकेल. मल्टी डिव्हाईस सपोर्टच्या फीचरसाठी गेल्या काही दिवसांपासून टेस्टिंग करण्यात येत होती.2 / 7WABetainfo च्या एका रिपोर्टनुसार, Linked Device एक ऑप्शन सुद्धा दाखविण्यात आला आहे. याचा स्क्रिनशॉट सुद्धा शेअर करण्यात आला आहे. WhatsApp च्या लेटेस्ट बीटामध्ये Linked Device ची स्क्रीन दिली आहे. हे Android 2.20.143 चे अपडेट आहे.3 / 7मल्टी डिव्हाइस सपोर्ट आल्यानंतर एकाचवेळी एकाहून अधिक स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप सुरु केले जाऊ शकते. या स्क्रीन शॉटमध्ये लिहिले आहे की, 'दुसऱ्या डिव्हाईसमध्ये सुद्धा व्हॉट्सअॅपचा वापर करा. आपल्या कॅम्प्युटर किंवा फेसबुक पोर्टलवरून मेसेज पाठवा किंवा रिसिव्ह करा.'4 / 7या स्क्रीनशॉटमध्ये एक ग्रीन बटन दिसत आहे. यामध्ये Link Device लिहिले आहे. रिपोर्टनुसार, सध्या या फीचरचे डेव्हलपमेंट सुरु आहे. मात्र, कंपनीने हे फीचर कधी आणले जाणार, याबाबत अद्याप स्पष्ट केले नाही. 5 / 7दुसर्या रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, मल्टी डिव्हाईस सपोर्ट सामान्य अॅपपेक्षा थोडा वेगळा असणार आहे. त्याला वायफायची गरज असण्याची शक्यता आहे.6 / 7 मोबाइल डेटा कमी होऊ शकतो किंवा त्याचा वापर जास्त होऊ शकतो म्हणून यासाठी वायफायला कनेक्ट करण्यास सांगितले जाऊ शकते. 7 / 7दरम्यान, सध्या एका मोबाईलवर एक व्हॉट्सअॅपचा वापर होतो. याशिवाय, डेस्कटॉप अॅप किंवा व्हॉट्सअॅप वेब वापरू शकता. त्यामुळे आता आगामी फीचर पाहणे औत्सुक्याचे असेल. आणखी वाचा Subscribe to Notifications