शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

PF मधील पैसे काढायचे आहेत का? UMANG App वर काही क्लिक्समध्ये होईल काम

By सिद्धेश जाधव | Published: January 12, 2022 7:46 PM

1 / 7
UMANG App चा वापर करून अगदी सहज पीएफ संबंधित काम करता येतात. यात बॅलेन्स बघणं, UAN नंबर अ‍ॅक्टिव्हेट करणं अशी काम देखील करता येतात. EPFO (Employees Provident Fund Organization) नं काही क्लिक्समध्ये कामं करता यावी म्हणून अ‍ॅपची सुविधा दिली आहे.
2 / 7
उमंग अ‍ॅपवरून EPFO सर्व्हिसेस वापरता येतात. या अ‍ॅपवरून UAN नंबर अ‍ॅक्टिव्हेट करता येतो. तसेच अ‍ॅपच्या मदतीने PF अकॉउंटमधून पैसे काढता देखील येतात. पुढे आम्ही याची संपूर्ण पद्धत सांगितली आहे.
3 / 7
UMANG अ‍ॅपवरून पैसे काढण्यासाठी सर्वप्रथम गुगल प्ले स्टोरवरून तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोनवर हे अ‍ॅप इन्स्टॉल करा.
4 / 7
इन्स्टॉल केलेलं UMANG अ‍ॅप ओपन करा आणि त्यात सर्च मेन्यू मध्ये जाऊन EPFO सर्विससाठी दिलेल्या ऑप्शनवर क्लिक करा.
5 / 7
त्यानंतर Employee Centric ऑप्शनची निवड करा आणि Raise Claim वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा EPF UAN नंबर टाका त्यानंतर नंबरवर आलेला OTP सबमिट करा.
6 / 7
त्यानंतर Withdrawal च्या प्रकारची निवड करा. म्हणजे तुम्हाला Claim रिफ्रेंश नंबर मिळेल. या नंबरचा वापर करून तुम्ही क्लेम स्टेटस बघू शकाल.
7 / 7
UMANG अ‍ॅपच्या माध्यमातून PF च्या नियमानुसार पैसे काढता येतात. तुमचा UAN नंबर आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. तसेच फोन नंबर देखील आधार कार्डशी लिंक असावा. तसेच आधार UMANG App शी आल्यास अ‍ॅपच्या माध्यमातून PF चे पैसे काढू शकता.
टॅग्स :Provident Fundभविष्य निर्वाह निधीtechnologyतंत्रज्ञान