this is how you can schedule emails on gmail
Gmail वर असा करा ई-मेल शेड्यूल By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 2:06 PM1 / 8गुगल नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. ई-मेल सर्व्हिस म्हणजेच Gmail मध्ये मेल शेड्यूल करता येतात. गेल्या वर्षी गुगलने हे फीचर आणले होते.2 / 8Gmail च्या या फीचरच्या मदतीने मेल फेसबुक पोस्ट प्रमाणे शेड्यूल करता येतात. याचा फायदा हा सर्वांनाच होत आहे. मेल शेड्यूल कसा करायचा हे जाणून घेऊया. 3 / 8सर्वप्रथम ब्राऊजर ओपन करून त्यामध्ये Gmail ओपन करा. त्यानंतर आपला ई-मेल आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा. 4 / 8Gmail अकाऊंट ओपन केल्यानंतर 'Compose' वर क्लिक करा. त्यानंतर New Message विंडो ओपन झाल्यावर तुम्हाला हवा असलेला मेल लिहून ज्यांना तो मेल पाठवायचा आहे त्यांचा मेल आयडी टाका. 5 / 8मेल आणि मेल आयडी टाईप केल्यानंतर खाली Send हा पर्याय दिसेल. त्यावेळी Send वर क्लिक करण्याऐवजी त्याच्या बाजूला असलेल्या एका आयकॉन वर क्लिक करा. त्यानंतर Schedule Send वर क्लिक करा. 6 / 8Schedule Send वर क्लिक केल्यानंतर एक छोटी विंडो ओपन होईल. त्यामध्ये पॉसिबल टाईम ऑप्शन्स देण्यात येतील. 7 / 8पॉसिबल टाईम ऑप्शन्समध्ये तुम्हाला हवी असलेली वेळ देण्यात आली नसेल तर 'Pick Date and Time' वर क्लिक करा. 8 / 8क्लिक केल्यानंतर एक कॅलेंडर ओपन होईल. जिथे डेट आणि टाईम निवडण्याचा पर्याय देण्यात आलेला आहे. त्यानंतर वेळ निवडून आपण मेल शेड्यूल करू शकतो. आणखी वाचा Subscribe to Notifications