Huawei Mate 20 X 5G Smartphone Launched in Switzerland for Rs 68,000
5G ची स्पर्धा रंगली; वनप्लस 7 आधीच या भीडूची एन्ट्री By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2019 5:08 PM1 / 8जगभरात 5G नेटवर्कचे जाळे विस्तारले जात असतानाच सर्वच कंपन्यांमध्ये 5G फोनसाठी स्पर्धा लागली आहे. सॅमसंग, ओप्पो आणि एमआयनंतर चीनची आणखी एक कंपनी Huawei ने Mate 20 X हा फोन लाँच केला आहे. महत्वाचे म्हणजे वनप्लस 7 हा फोन येत्या काही दिवसांतच लाँच होणार आहे. 2 / 8Huawei आधी Oppo Reno 5G, Mi Mix 3 5G हे फोन लाँच झालेले आहेत. ह्युवेईने MWC 2019 मध्ये Huawei X हा फोल्डेबल स्मार्टफोन दाखविला होता. Huawei Mate 20 X 5G हा फोन स्वित्झरलँडमध्ये लाँच करण्यात आला. यामध्ये Balong 5000 5G मोडेम देण्यात आले आहे. यामुळे 5G नेटवर्क पकडणे सोपे जाते. 3 / 8या मोबाईलची किंमत 68 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनचे 4जी व्हेरिअंटही लाँच करण्यात आले आहे. यामध्ये 5000 एमएएचची बॅटरी आणि 22.5 वॅटचा फास्ट चार्जर देण्यात आला आहे. तर 5जी साठी 4200 एमएएच बॅटरी आणि 40 वॅट फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. 4 / 8फोनमध्ये 40 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 20 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेंन्सरसह 8 मेगापिक्सलचा टेलिफोटो सेन्सर देण्यात आला आहे.5 / 8पुढील बाजुला वॉटरड्रॉप नॉचमध्ये 24 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.6 / 8Mate 20 X 5G मध्ये 7.2 इंचाचा अमोल्ड डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रिझोल्युशन 2244 x 1080 पिक्सल आहे, फोनला HiSilicon Kirin 980 ऑक्टाकोअर प्रोसेसर देण्यात आला आहे. 5जी व्हेरिअंटमध्ये 6 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटर्नल स्टोरेज देण्यात आली आहे. 7 / 8Mate 20 X 5G Android 9.0 Pie देण्य़ात आली असून EMUI 9.0 ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली आहे. पुढील पॅनल पाणी आणि धुळीपासून बचाव करणारे आहे. तसेच फोनमध्ये ड्युअल स्मार्ट Hi-Fi ऑडियो आउटपुट देण्यात आले आहे. तसेच रिअर फेसिंग फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.8 / 8Mate 20 X 5G Android 9.0 Pie देण्य़ात आली असून EMUI 9.0 ऑपरेटिंग सिस्टिम देण्यात आली आहे. पुढील पॅनल पाणी आणि धुळीपासून बचाव करणारे आहे. तसेच फोनमध्ये ड्युअल स्मार्ट Hi-Fi ऑडियो आउटपुट देण्यात आले आहे. तसेच रिअर फेसिंग फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications