शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तुम्हीही रात्रीच्या अंधारात तसले व्हिडीओ पाहत नाही ना? आजच बंद करा, उद्योग भारी पडेल...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 4:25 PM

1 / 7
भारतात सर्व प्रकारचे व्हिडीओ पाहण्यासाठी परवानगी नाहीय. अनेक असे व्हिडीओचे प्रकार आहेत जे बॅन केलेले आहेत. यात तसले व्हिडीओ देखील येतात. तरी देखील अनेकजण तसले व्हिडीओ खासगीत लपून, छपून पाहतात. अनेकजण तर स्मार्ट समजतात आणि स्मार्टफोनवर अश्लिल व्हिडीओ पाहत बसतात.
2 / 7
या लोकांना वाटत असते की ते जे काही पाहत आहेत, म्हणजेच फोनचा प्रायव्हेट मोड ऑन करून देखील, ते कोणाच्याच लक्षात येत नाहीय. परंतू, तसे नाहीये. हे लोक जेव्हा अशाप्रकारचे अश्लिल कंटेंट पाहत असतात, तेव्हा हजारो एआय बॉट तुमच्या दिशेने डोळे वटारून लक्ष ठेवत असतात.
3 / 7
जर तुम्ही अशा प्रकारचे कंटेंट तुमच्या मोबाईलवर पाहत असाल तर गुप्तचर यंत्रणांची नजर तुमच्यावर असते. याची माहिती सर्वात आधी तुमच्या मोबाईल सर्व्हिस ऑपरेटरकडे जाते. यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये असलेल्या अॅप्सवर देखील नजर ठेवली जाते. ब्राऊजिंग हिस्ट्रीवर नजर ठेवली जाते. लष्करी अधिकारी देखील अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये फसतात, नंतर हनीट्रॅप होतात.
4 / 7
तुमचे ब्राऊजिंग पॅटर्नही तपासला जातो. यामध्ये देखील तुम्ही ट्रॅक होऊ शकता. सोबतच तुमच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर नजर ठेवली जाते. हे पाहिल्यानंतर तुम्हाला कोणती जाहिरात दाखवावी हे ठरविले जाते. यामध्ये अश्लिल जाहिराती देखील असतात. तुमच्या गुगलवर किंवा व्हिडीओवर अशा जाहिराती किंवा बातम्या दाखविल्या जातात. याचाच अर्थ तुमची चोरी छुपी गोष्ट पकडली गेली आहे.
5 / 7
अनेक लोक असे असतात जे अश्लिल व्हिडीओ, फोटो पाहण्यासाठी पैसे देण्यासही तयार होतात. एकदा का त्यांना पैसे वळते केले की त्या लोकांची बँक डिटेल्स लीक होतात, मग त्याचा वापर पैसे काढण्यासाठी, फ्रॉड करण्यासाठी होतो. अशाप्रकारै पैसे गेलेले लोक त्याची वाच्यताही करत नाहीत, कारण खरी चोरी वेगळीच असते.
6 / 7
अश्लिल व्हिडीओ पाहण्यासाठी लोक या ना त्या पॉर्न वेबसाईटवर जातात. तिथून काही डाऊनलोड करतात. काहीवेळा ते अॅप असतात. अशाप्रकारे तुमच्या स्मार्टफोनमध्ये मालवेअर प्रवेश करतो. तो तुमची गुप्त माहिती हॅकरना पुरवत असतो. यात अनेकदा खासगी फोटो, संभाषण आदी देखील असते. याद्वारे या लोकांना खासगी माहिती लीक करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेलही केले जाते.
7 / 7
यामुळे हे असले अश्लिल उद्योग करणे किती महागात पडू शकते, याचा अंदाज येतो. काहीवेळा अमेरिकेसारख्या देशांतील संस्था भारताकडे तुमच्या आयपी अॅड्रेससह तक्रार करतात. या अश्लिल उद्योग करणाऱ्यांना अनेकदा तुरुंगातही जावे लागले आहे. यामध्ये शिक्षक, बिझनेसमन यांच्यासारख्यांचा देखील समावेश आहे.
टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम