शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

iPhoneचे जुने व्हर्जन विकत घेणार असाल तर थांबा! होऊ शकतं तुमचं मोठं नुकसान; महत्त्वाचे अपडेट समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 8:17 PM

1 / 9
स्टेटस सिम्बॉल आणि आधुनिक फिचर्ससाठी ओळखला जाणारा आयफोन आपल्याकडेही असावा, असं प्रत्येकालाच वाटतं. मात्र अनेक जण आयफोनच्या किंमतीकडे बघून हा फोन घेणं टाळतात किंवा त्याची किंमत कमी होण्याची वाट पाहतात. मात्र आता जुन्या व्हर्जनचा आयफोन खरेदी करणं तुमच्यासाठी नुकसानदायक होऊ शकतं.
2 / 9
अॅपल कंपनी आपल्याला जुन्या फोनलाही अनेक काळापर्यंत अपडेट उपलब्ध करत असते. जर तुमच्याकडे आयफोन १३ असेल किंवा आयफोन १५ असेल तरी कंपनीकडे एखादे लेटेस्ट अपडेट आल्यानंतर ते सर्व व्हर्जनसाठी उपलब्ध असते.
3 / 9
नवे अपडेटही उपलब्ध होत असल्यामुळे जुन्या आयफोन व्हर्जनमध्ये नवे फीचर्स वापरता येतात.
4 / 9
ग्राहकांच्या प्रायव्हसीच्या दृष्टीकोनातूनही आयफोन हा एक उत्तम पर्याय मानला जातो. कंपनीकडून वेळोवेळी सेक्युरिटी अपडेट दिले जातात.
5 / 9
आयफोनच्या ग्राहकांना कंपनीकडून वारंवार सुरक्षेशी संबंधित अलर्टही जारी केले जातात.
6 / 9
आयफोन १३ किंवा त्यापेक्षा जुने व्हर्जन हे तर ५० हजारांपेक्षा कमी किंमतीमध्ये सध्या उपलब्ध आहेत. तसंच एक्सचेंज ऑफरमध्येही आयफोनची खरेदी करता येते.
7 / 9
दरम्यान, तुम्ही कमी किंमतीतील आयफोन खरेदी करण्यासाठी त्याचे जुने व्हर्जन वापरणार असाल तर आता मात्र तुम्हाला काहीशा तोट्याचा सामना करावा लागू शकतो.
8 / 9
कारण आयफोनकडून एआय फीचर उपलब्ध केले जाणार आहे. मात्र या फीचरचे अपडेट आयफोन १५ प्रो शिवाय इतर कोणत्याही फोनमध्ये दिले जाणार नाही.
9 / 9
दरम्यान, आयफोनकडून नवे एआय फीचर हे फक्त iPhone 15 Pro आणि Pro-Max या दोन स्मार्टफोन्समध्ये दिले जाणार आहे.
टॅग्स :Apple iPhone Xअ‍ॅपल आयफोन XApple's Mega Launch Eventअ‍ॅपल मेगा लाँचSmartphoneस्मार्टफोनMobileमोबाइल