शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोबाईल वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी: 'या' अँड्रॉइड यूजर्सना धोका, सरकारी संस्थेकडून इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 3:20 PM

1 / 8
CERT-In या सरकारी संस्थेनं भारतीय स्मार्टफोन आणि टॅबलेट यूजर्सला सावधानतेचा इशारा दिला आहे. जुने अँड्रॉइड व्हर्जन वापरणाऱ्या ग्राहकांसाठी हा इशारा देण्यात आला आहे.
2 / 8
CERT-In (Indian Computer Emergency Response Team)ने हा इशारा अतिमहत्त्वाचा असल्याचंही सांगितलं आहे.
3 / 8
CERT-In च्या म्हणण्यांनुसार अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टममध्ये अनेक प्रकारची वल्नेरेबिलिटीज आढळून आली आहे. याचा फायदा सायबर अॅटॅकर उठवण्याचा धोका निर्माण झाला आहे.
4 / 8
या कमरतेमुळे हॅकर्स तुमच्या फोनला टार्गेट करून त्यातील सेन्सेटिव्ह डेटा चोरू शकतात.
5 / 8
कोणत्या यूजर्सला आहे धोका?- Android 12, Android 13 आणि Android 14 या व्हर्जन्सच्या आधीच्या व्हर्जन्समध्ये ही कमतरता आढळून आली आहे.
6 / 8
कोणत्या कारणामुळे निर्माण झाली अडचण?- फ्रेमवर्क, सिस्टम, गुगल प्ले सिस्टम अपडेट्स, Kernel, आर्म कंपोनंट्स आणि क्वालकॉम क्लोज सोर्स कंपोनंट्समध्ये असलेल्या कमतरतांमुळे या वल्नेरेबिलिटीज झाल्याचं सांगितलं जात आहे.
7 / 8
काय आहे एजन्सीचं म्हणणं?- वल्नेरेबिलिटीजचा फायदा उचलून लोकल अॅटॅकर्स आपल्या फोनमधील सेन्सेटिव्ह डेटा चोरू शकतात.
8 / 8
लगेच अपग्रेड करा तुमचा फोन - जर तुम्हीही अँड्रॉइडचं जुनं व्हर्जन वापरत असाल तर लवकरात लवकर तुम्ही तुमच्या फोनमध्ये अँड्रॉइडचे लेटेस्ट व्हर्जन अपग्रेड करणं आवश्यक आहे.
टॅग्स :Androidअँड्रॉईडCentral Governmentकेंद्र सरकारtechnologyतंत्रज्ञान