Important news for WhatsApp Insta and Facebook users Chatting and video calling will be fun
WhatsApp, Insta आणि Facebook यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी; चॅटिंग आणि व्हिडिओ कॉलिंग मजेशीर होणार, कारण... By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 6:33 PM1 / 7व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक वापरणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण मेटा एआयकडून एक महत्त्वाचे अपडेट देण्यात येणार आहे. 2 / 7सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर मेटा एआय चॅटबोटचा वापर केला जात आहे. नव्या अपडेटमुळे या प्लॅटफॉर्म्सवर चॅटिंग आणि व्हिडिओ कॉल करणं आता आधीपेक्षा जास्त सोपं आणि मजेशीर होणार आहे.3 / 7सोशल मीडिया युजर्सना मेटा एआय चॅटबोटच्या मदतीने २२ भाषांमध्ये चॅटिंग, व्हिडिओ आणि व्हाइस कॉलिंग करणं शक्य होणार आहे.4 / 7हे चॅटबोट नव्या भाषांसह प्रॉम्ट्सला अॅक्सेप्ट करतील. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट लिहून पाठवली की त्यावर चॅटबोट कृती करेल. 5 / 7भविष्यात एआय चॅटबोट तु्म्हाला तुमच्या प्रादेशिक भाषेतही उत्तर देऊ शकणार आहे.6 / 7दरम्यान, कंपनीकडून नवे इमेज जनरेशन फीचरही तयार केले जात आहे. 7 / 7नव्या इमेज जनरेशन फीचरचा वापर करून यूजर इमेज डिटेल्सचे प्रॉम्ट देऊन इमेज तयार करू शकतात. सध्या हे फीचर बीटा यूजर्ससाठी उपलब्ध करण्यात आलं आहे. हा बीटा प्रोग्राम अमेरिकेत सुरू करण्यात आला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications