Alert! Mobikwik च्या १० कोटी भारतीय युझर्सचा डेटा चोरल्याचा हॅकर्सचा दावा; कंपनीनही दिलं स्पष्टीकरण By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 9:22 AM
1 / 15 फिनटेक स्टार्टअप mobikwik ९.९ दशलक्ष भारतीय युझर्सचा डेटा चोरल्याचा दावा हॅकर्सनी केला आहे. यामध्ये या लोकांचे मोबाईल क्रमांक, बँक खात्याचा तपशील, ईमेल आणि क्रेडिट कार्ड नंबर यांचा समावेश आहे. 2 / 15 परंतु कंपनीनं याचं खंडन केलं आहे. या डेटा हॅकिंगचा खुलासा सायबर सुरक्षा विश्लेषक राजशेखर रजहरिया यांनी केला आहे. 3 / 15 राजहरिया यांनी भारतीय रिझर्व्ह बँक, इंडियन कंम्प्युटर इमरजन्सी रिस्पॉन्स टीम, पीसीआय मानके आणि पेमेंट टेक्नॉलॉजी कंपन्यांनाही याबाबत लेखी स्वरूपात याची माहिती दिली आहे. 4 / 15 जॉर्डन डेवेन या हॅकर टीमनं वृत्तसंस्था पीटीआयला डेटाबेसची लिंकदेखील ई-मेल केली आहे. या डेटाचा वापर करण्याचा आपला हेतू नाही असंही या हॅकर समूहानं नमूद केलं आहे. 5 / 15 आपला हेतू केवळ कंपनीकडून पैसे घेण्याचा असल्याचं या समूहानं म्हटलं आहे. पैसे मिळाल्यानंतर हा डेटा डिलीट केला जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. 6 / 15 जॉर्डवेननं मोबिक्विकचे संस्थापन बिपिन प्रीत सिंह आणि मोबिक्विकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी उपासान ताकू यांनादेखील या डेटाबेसचा तपशीप देण्यात आला आहे. 7 / 15 मोबिक्विकनं मात्र या दाव्याला नकार दिला आहे. कंपनी ग्राहकांच्या डेटाबाबत अधिक गंभीर आहे आणि सुरक्षा कायद्यांचं पूर्णपणे पालन करतं, असं कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. 8 / 15 दरम्यान हॅकर समूहानं हा टेडा मोबिक्विकचा असल्याचा दावा केला आहे. 9 / 15 या ग्रुपने मोबिक्विक क्यूआर कोडची बरीच छायाचित्रे व ग्राहकांना जाणून घेण्यासाठी त्यांचे कागदपत्रे आधार आणि पॅनकार्डसह अपलोड केली आहेत. 10 / 15 यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसोबत काम करत असल्याचं मोबिक्विकनं स्पष्ट केलं आहे. तसंच या आरोपांचे गांभीर्य लक्षात घेता तिसऱ्या पक्षामार्फत फॉरेन्सिक डेटा सिक्युरिटी ऑडिट करणार असल्याचंही कंपनीनं म्हटलं आहे. 11 / 15 मोबिक्विकची सर्व खाती आणि त्यातील रक्कम पूर्णपणे सुरक्षित असल्याचं कंपनीनं म्हटलं. 12 / 15 'सरकारी अधिकाऱ्यांनी तातडीने या प्रकरणाची सखोल चौकशी केली पाहिजे, कारण त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आणि यामुळे आर्थिक फसवणूक होऊ शकते,' अशी प्रतिक्रिया यानंतर राजहरिया यांनी दिली. 13 / 15 जर तुम्हाला तुमचा अकाऊंट हँक झाल्याची शंका असेल तर https://cybernews.com/personal-data-leak-check/ यावर क्लिक करावं लागेल. यावर तुम्ही तुमचा ईमेल आयडी टाकून तुमची माहिती लीक झाली आहे किंवा नाही हे पाहू शकता. 14 / 15 जर तुमचा ईमेल आणि पासवर्ड लीक झाला असेल तर तुम्ही तो त्वरित बदलला पाहिजे. 15 / 15 याशिवाय बँक अकाऊंट किंवा कार्डाची माहिती लीक झाली असेल तर तुम्हाला त्वरित कार्ड ब्लॉक करून पासवर्ड बदलण्याची गरज आहे. आणखी वाचा