शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

TikTok ला टक्कर देणारं इंडियन अ‍ॅप पाहिलंत का?; 50 लाख लोकांनी केलं डाऊनलोड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 3:57 PM

1 / 12
शॉर्ट व्हिडिओ मेकिंग आणि शेअरिंग प्लॅटफॉर्म असलेल्या टिकटॉकची प्रचंड क्रेझ तरुणांमध्ये पाहायला मिळत आहे.
2 / 12
सध्या टिकटॉकला एक इंडियन अ‍ॅप जोरदार टक्कर देत आहे. Mitron असं या अ‍ॅपचं नवा असून आतापर्यंत हे तब्बल 50 लाखांहून अधिक वेळा डाऊनलोड करण्यात आले आहे. 
3 / 12
जवळपास एका महिन्यापूर्वी लाँच झालेले हे अ‍ॅप अल्पावधीतच खूप लोकप्रिय झालं आहे. आयआयटी रुडकीच्या एका विद्यार्थ्याने हे अ‍ॅप तयार केलं आहे.
4 / 12
शिवांक अग्रवाल या मुलाने Mitron तयार केले आहे. या अ‍ॅपने गुगल प्ले स्टोरवर टॉप फ्री चार्टमध्ये टॉप 10 च्या यादीत स्थान मिळवले आहे. 
5 / 12
टीएमचे माजी सीनिअर व्हाईस प्रेसिडेंट दीपक यांच्याकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये हे अ‍ॅप दुसऱ्या पोझिशनला दिसत आहे. 
6 / 12
Mitron अ‍ॅपमध्ये टिकटॉकपेक्षा फार वेगळे फीचर्स दिले नाहीत. मात्र हे आपल्या नावाने आणि ब्रँडिंगमुळे अल्पावधीत लोकप्रिय झाले आहे.
7 / 12
अ‍ॅप आता नवीन आहे. यात अनेक बग्स आहेत. असे असले तरी याला पॉझिटिव्ह रिव्ह्यू आणि रेटिंग्स मिळाली आहे. जवळपास 4.7 रेटिंग्स मिळणाऱ्या अ‍ॅपमध्ये बरेच बग्स असल्याचे युजर्संनी सांगितले. 
8 / 12
लॉग इन करण्यातही काहींना अडचणी येत असल्याचे म्हटले आहे. मात्र इंडियन प्लॅटफॉर्म असल्याने लोकांची याला अधिक पसंती मिळत आहे. अ‍ॅपमध्ये टिकटॉक सारखे एडिटिंग फीचर्स सुद्धा नाहीत. 
9 / 12
ऑडिओ अ‍ॅड करण्याचा ऑप्शन सुद्धा मर्यादीत आहे. जर डेव्हलपर या दरम्यान बग्सला फिक्स करीत असेल किंवा नवीन फीचर्स अ‍ॅड केले तर हे अ‍ॅप खूप कमी कालावधीत प्रसिद्ध होईल.
10 / 12
फक्त 8.03 एमबी साईज असलेलं हे अ‍ॅप 11 एप्रिल 2020 रोजी रिलीज करण्यात आले आहे आणि 24 मे रोजी अपडेट मिळाले आहे. 
11 / 12
Mitron अ‍ॅप केवळ अँड्रॉईड युजर्संसाठी उपलब्ध आहे. गुगल प्ले स्टोरवरून हे डाऊनलोड करता येऊ शकते.
12 / 12
अ‍ॅपचा इंटरफेस टिकटॉकसारखाच आहे. सध्या केवळ गुगलच्या मदतीने हे लॉग इन करता येऊ शकते.
टॅग्स :Tik Tok Appटिक-टॉकIndiaभारतtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल