शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अखेर निर्णय झाला! एक देश, एक चार्जर...आता सर्व फोन, टॅबलेट अन् लॅपटॉपला Type-C पोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2023 5:47 PM

1 / 8
Type-C पोर्टला कॉमन चार्जर घोषीत करण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. आता केंद्र सरकारनं याबाबतचा महत्वाचा निर्णय घेत टाइप-सी केबलला स्टँडर्ड केबल म्हणून निश्चित केलं आहे. Type-c चार्जिंग केबलला मोबाइल फोन, लॅपटॉप, नोटबूक आणि इतर इलेक्ट्रॉनिक्ससाठी मानक केलं आहे. यामुळे युझरला आता वेगवेगळे चार्जर खरेदी करण्याची गरज नाही. नव्या मानकानुसार आता एकाच चार्जरमधून अनेक डिव्हाइस चार्ज केले जाऊ शकणार आहेत.
2 / 8
ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने (BIS) Type-C स्टँडर्ड भारतात विक्री केल्या जाणाऱ्या स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइससाठी असणार आहे, असं जाहीर केलं आहे. या निर्णयामुळे चार्जरची संख्या कमी केली जाईल आणि लोक एकाच चार्जरनं अनेक डिव्हाइस चार्ज करू शकतील. वेगवेगळ्या उपकरांसाठी वेगवेगळे चार्जर खरेदी करण्याची गरज भासणार नाही.
3 / 8
BIS नं आपल्या स्टेटमेंटमध्ये हेही नमूद केलं आहे की भारत आपल्या इलेक्ट्रॉनिक कचरा कमी करण्याबाबतच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करत आहे आणि या निर्णयातून यास मदत होईल.
4 / 8
ग्राहकांना याआधी वेगवेगळ्या इलेक्टॉनिक उपकरणांसाठी वेगवेगळे चार्जर खरेदी करावे लागत होते. यामुळे ग्राहकांनाही अतिरिक्त खर्च करावा लागत होता. तसंच ई-कचरा देखील वाढत होता. तसंच इतरही अनेक समस्या होत्या.
5 / 8
रिपोर्टमधील नमूद माहितीनुसार जगभरात या समस्येवर तोडगा काढण्यासाठी वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत. डिसेंबर २०२२ मध्ये कंझ्युमर अफेयरचे सचिव रोहित कुमार ह यांनी दावा केला होता की कंपन्या आता USB Type-C स्मार्टफोन, टॅबलेट आणि लॅपटॉपसाठी चार्जिंग पोर्ट बनवण्यासाठी तयार झाल्या आहेत.
6 / 8
BIS ने Type C चार्जर स्टँडर्ड केबल म्हणून घोषीत केलं आहे. याआधी युरोपियन युनियननं देखील Type-C केबलला बंधनकारक करण्यासाठीचा आदेश पारीत केला आहे.
7 / 8
रोहित सिंह यांच्या माहितीनुसार युरोपियन युनियनच्या २०२४ सालच्या टाइमलाइनमध्ये कॉमन चार्जिंग पोर्टला अशापद्धतीनं वापरता येईल जेणेकरुन इंडस्ट्री आणि ग्राहक अशा दोघांनाही याचा सुलभतेनं वापर करता येईल.
8 / 8
सध्या फोन, टॅबलेट आणि लॅपटॉप चार्ज करण्यासाठी वेगवेगळे चार्जिंग पोर्टचा वापर केला जातो. तर आयफोन आणि इतर अनेक अँड्रॉइड फोनचे पोर्टही वेगवेगळे असतात. पण या निर्णयानंतर सर्व कंपन्यांना आपल्या डिव्हाइसमध्ये Type-C चार्जिंग पोर्ट द्यावं लागणार आहे.
टॅग्स :technologyतंत्रज्ञान