शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोबाइल सायबर हल्ल्यांमध्ये भारत आघाडीवर; २०० हून अधिक अ‍ॅप्स धोकादायक!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2024 12:31 PM

1 / 6
नवी दिल्ली : भारतीयांच्या मोबाइलवर सध्या जगात सर्वाधिक हल्ले होत असून, याद्वारे खासगी माहिती चोरण्यासह आर्थिक गंडाही घातला जात आहे. 'जेडस्केलर थ्रेटलॅब्ज २०२४ मोबाइल, आयओटी अँड ओटी थ्रेट' अहवालात समोर आले आहे.
2 / 6
या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, भारत हे मोबाइल मालवेअर हल्ल्यांचे सर्वात मोठे लक्ष्य बनले आहे. जून २०२३ ते मे २०२४ दरम्यान जगभरातील सर्व मोबाइल मालवेअर हल्ल्यांपैकी सर्वाधिक २८ टक्के भारतात झाले. यानंतर अमेरिकेत २७.३ टक्के आणि कॅनडात १५.९ टक्के हल्ले झाले.
3 / 6
अहवालात बँकिंग मालवेअर हल्ल्यांमध्ये २९ टक्के आणि मोबाइल स्पायवेअर हल्ल्यांमध्ये १११ टक्के वाढ झाल्याचे समोर आले आहे. भारतीय टपाल सेवाही सायबर हल्लेखोरांचे लक्ष्य बनली. दरम्यान, एसएमएस वापरून हल्लेखोर मोबाइल युजर्सना फिशिंग साइट्सना भेट देण्यासाठी सांगतात. जे त्यांना क्रेडिट कार्ड डिटेल्स प्रविष्ट करण्यास सूचित करतात.
4 / 6
'मालवेअर' हे सॉफ्टवेअर मोबाइल किंवा संगणकावर एखाद्याची ओळख चोरण्यासाठी किंवा गोपनीय माहिती चोरण्यासाठी वापरले जाते. स्पायवेअर हा मालवेअरचा एक प्रकार आहे. याद्वारे एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती त्याच्या नकळत मिळवली जाते.
5 / 6
थ्रेटलॅब्ज विश्लेषकांच्या मते, एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि अॅक्सिससारख्या प्रमुख भारतीय बँकांच्या मोबाइल ग्राहकांना लक्ष्य करून फिशिंग केले जात आहे. या बँकांच्या ग्राहकांवरील हल्ले वाढले आहेत.
6 / 6
अभ्यासात गुगल प्ले स्टोअरवर २०० पेक्षा अधिक असे अ‍ॅप्स आढळून आले आहेत, जे सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक आहेत.
टॅग्स :Mobileमोबाइलcyber crimeसायबर क्राइमtechnologyतंत्रज्ञानBanking Sectorबँकिंग क्षेत्र