शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारत जगातील सर्वात मोठा iPhone उत्पादक देश बनणार, चीनच्या स्वप्नांना असा लावला सुरुंग!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2022 11:11 AM

1 / 8
भारत आता जगातील सर्वात मोठा iPhone उत्पादक देश बनणार आहे. अमेरिकन दिग्गज स्मार्टफोन कंपनी Apple नं चीनबाहेर प्रोडक्शन युनिट्स वाढवण्याचा विचार करत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार स्थानिक पातळीवर आयफोन निर्मितीत भारताचा वाटा सर्वाधिक असण्याचा अंदाज आहे.
2 / 8
फॉक्सकॉन, पेगाट्रॉन आणि विस्ट्रॉन यांना सरकारच्या ४१,००० कोटी रुपयांच्या उत्पादनाशी संबंधित पीएलआय योजनेचा लाभ मिळत आहे, ज्यामुळे भारतात आयफोनचे उत्पादन वेगाने वाढणार आहे.
3 / 8
चीन आणि अमेरिका यांच्यातील तणावादरम्यान अॅपल हळूहळू आयफोन निर्मितीचा मोठा भाग भारतात हस्तांतरित करत आहे. तज्ज्ञांच्या मते, चीनमध्ये कोविड लॉकडाऊनमुळे उत्पादनात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत, त्यामुळे कंपनीने मॅन्युफॅक्चरिंग शिफ्ट करण्याच्या योजनेला वेग दिला आहे.
4 / 8
फॉक्सकॉनचा झेंगझोऊ, चीनमधील प्लांट हा जगातील सर्वात मोठा आयफोन निर्मिती युनिट आहे. गेल्या महिन्यात, प्रख्यात Apple विश्लेषक मिंग-ची कुओ यांनी एका ट्विटमध्ये म्हटले होते की फॉक्सकॉन आपल्या भारतातील प्लांटची क्षमता वाढवत आहे. यामुळे भारतात फॉक्सकॉनने बनवलेले आयफोन २०२३ मध्ये किमान १५० टक्के दराने वाढतील आणि काही वर्षांत ४० ते ४५ टक्के आयफोन भारतातून पाठवले जातील.
5 / 8
जेपी मॉर्गन (21 सप्टेंबर, 2022) च्या अहवालानुसार, Apple ने 2025 पर्यंत आपल्या आयफोन उत्पादनातील २५ टक्के भारतात स्थलांतरित करण्याची योजना आखली आहे. जेणेकरुन सध्या चीनवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेल्या उत्पादन प्लांटमध्ये विविधता आणता येईल. इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (ICEA) चे अध्यक्ष पंकज महेंद्रू यांच्या माहितीनुसार केवळ राजकीय परिस्थितीमुळे नव्हे, तर भारत सरकारची पीएलआय योजना देखील Apple कंपनीला आकर्षित करण्याचं एक मोठं कारण आहे.
6 / 8
Apple ने सप्टेंबर २०२२ च्या आर्थिक वर्षात २०५ अब्ज डॉलर किमतीच्या स्मार्टफोनची निर्मिती केली. काउंटरपॉईंट रिसर्चनुसार, २०२२ मध्ये जागतिक शिपमेंटच्या सुमारे ९१.२-९३.५ टक्के, २०२१ मध्ये ९५.८ टक्के आणि २०२० मध्ये ९८.२ टक्क्यांवरून मुख्य भूप्रदेशातील चीनचे योगदान हळूहळू कमी होत आहे. आयफोनसाठी अमेरिकेनंतर चीन ही दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे.
7 / 8
काही वर्षांपूर्वी जेव्हा अमेरिका-चीन तणाव शिगेला पोहोचला होता आणि अॅपलसह कंपन्या चीनला पर्याय शोधत होत्या, तेव्हा भारताने आपली PLI योजना सुरू केली. Apple च्या तीन मोठ्या करार उत्पादकांनी या योजनेअंतर्गत प्रोत्साहनासाठी यशस्वीपणे अर्ज केला. तेव्हापासून भारतात अॅपलच्या वस्तूंची निर्मिती केली जात आहे. तामिळनाडूतील फॉक्सकॉनच्या कारखान्यात लाँच झाल्यानंतर दहा दिवसांच्या आत iPhone 14 चे उत्पादन सुरू केलं. Pegatron तामिळनाडूतील त्यांच्या प्लांटमध्ये नवीनतम उपकरणं देखील तयार करत आहे.
8 / 8
सध्या Apple भारतात iPhone SE, iPhone 12, iPhone 13 आणि iPhone 14 (बेसिक) मॉडेल्सची निर्मिती करत आहे. देशात विकले जाणारे सर्व प्रो मॉडेल आयात केले जातात. आयडीसी इंडियाचे सहयोगी उपाध्यक्ष नवकेंदर सिंग यांच्या माहितीनुसार अॅपल भारतात प्रो मॉडेल असेंबल करण्यास सुरुवात करेल, ज्यापैकी ८५ टक्के सध्या चीनमध्ये बनवले जात आहे.
टॅग्स :Apple Incअॅपल