Instagram users can subscribe to their favorite creators or influencers via in app purchase
भारतीय क्रिएटर्सना कमाईची नवी संधी! Instagram वर आता पेड सबस्क्रिप्शन फिचर By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 7:52 PM1 / 9सोशल मीडियात सध्या इन्फ्लूएन्सर्सची मोठी चलती आहे. यातून अनेकजण मोठी कमाई देखील करू लागले आहेत. तर स्वत:चा बिझनेस सुरू करण्यासाठी इन्स्टाग्रामचा जास्तीत जास्त वापर सध्या केला जातो. 2 / 9इन्स्टाग्राम क्रिएटर्स आणि इन्फ्यूएन्सर्ससाठी एक नवं फिचर कंपनी लॉन्च करणार आहे. यामाध्यमातून चांगली कमाई करता येणार आहे. इन्स्टाग्रामवर पेड सबस्क्रिप्शन फिचर (Instagram Paid Subscription) आणलं जाणार आहे. 3 / 9लवकरच भारतातील युझर्ससाठी हे नवं फिचर उपलब्ध होणार असल्याचं सांगितलं जात आहे. हे नेमकं कसं काम करणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करुयात...4 / 9समोर आलेल्या माहितीनुसार, कन्टेंट क्रिएटर्स (Content Creators) आणि इन्फ्यूएन्सर्स (Influencers) आपल्या फॉलोअर्सकडून एक्सक्यूझीव्ह कंन्टेंटसाठी दरमहा पैसे आकारू शकणार आहेत. 5 / 9इन्स्टाग्रामवरील ज्या युझरनं तुमचं सबस्क्रिप्शन घेतलं असेल त्यांच्या युझरनेमच्या समोर एक जांभळ्या रंगाचा बॅच दिला जाईल. यासोबतच त्यांना एक्सक्लूझीव्ह इन्स्टाग्राम लाइव्ह व्हिडिओ आणि स्टोरीजचा अॅक्सेस देखील मिळणार आहे. 6 / 9सध्या अधिकृत पातळीवर ही सुविधा अमेरिकेतील मोजक्या कन्टेंट क्रिएटर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पण लवकरच भारतातील यूझर्सना देखील ती उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 7 / 9ट्विटर यूझर सलमान मेमन @salman_memon_7 नं नुकतंच एक स्क्रिनशॉट ट्विट केला आहे. यात भारतात देखील काही यूझर्सना इन्स्टाग्रामचं नवं फिचर उपलब्ध झाल्याचा दावा करण्यात आला आहे. 8 / 9आपल्या आवडत्या कन्टेंट क्रिएटरच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला फॉलो करण्यासाठी युझरला सबस्क्रिप्शन घ्यावं लागणार आहे. भारतात याची किंमत ८९ रुपये, ४४० रुपये आणि ८९० रुपये दरमहा इतकी असणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर अमेरिकेत याची किंमत दरमहा ०.९९ डॉलर पासून ते ९९.९९ डॉलर दरमहा इतकी असणार आहे.9 / 9सध्या भारतात क्रिएटर्स सबस्क्रिप्शन सिस्टमच्या माध्यमातून आपल्या फॉलोअर्सचं मॉनिटायझेशन करता येत नाही. पण भारतीय यूझर्ससाठी यूएस आधारित क्रिएटर्सची सदस्यत्व घेण्याचा पर्याय अॅप देत आहे. यूझर्स सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर पर्पल सब्सक्रायबर बॅचसोबतच एक्सक्ल्यूझीव्ह स्टोरी, लाइव्ह व्हिडिओसारखा कन्टेंटचा अॅक्सेस प्राप्त करता येणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications