Instant Update Your Apple Device, Warning of malware From IT Ministry
तात्काळ अपडेट करा तुमचा Apple डिव्हाइस, आयटी मंत्रालयाने दिला इशारा... By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 6:21 PM1 / 7 तुमच्याकडे Apple डिव्हाइस असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. तुम्हाला तुमच्याकडे असलेले अॅपलचे डिव्हाइस तात्काळ अपडेट करावे लागणार आहे.2 / 7 आयटी मंत्रालयाने, इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) मार्फत दिलेल्या सल्ल्यानुसार, ज्यांच्याकडे iPhone, MacBook, Apple Key Watch आणि Apple TV आहे त्यांनी त्यांची उपकरणे त्वरित अपडेट करावीत. 3 / 7 CERT-In ने म्हटले आहे की, Apple च्या उत्पादनांमध्ये अनेक सुरक्षा समस्या आढळल्या आहेत. तुम्ही तुमचे डिव्हाइस अपडेट न केल्यास, काही मालवेअर टाकून ते ट्रॅक केले जाण्याची किंवा तुमचा डेटा चोरीला जाण्याची शक्यता आहे.4 / 7 CERT-In ने आपल्या सल्ल्यात म्हटले आहे की, अॅपलच्या उत्पादनांमध्ये अनेक समस्या नोंदवण्यात आल्या आहेत, ज्याद्वारे हॅकर्स अवैध फायदे घेण्याचा प्रयत्न करू शकतो आणि तुमच्या डिव्हाइसच्या सुरक्षेत प्रवेश करू शकतो. 5 / 7Apple उत्पादनांमधील मेमोरी हँडलिंग, स्टेट मॅनेजमेंट, इनपुट वेलिडेशन, सर्च, फाइल मेटाडेटा हँडलिंग, स्टेट हँडलिंग, बाउंड चेकिंग, लॉकिंग, सँडबॉक्स प्रतिबंध (Sandbox restrictions), अॅक्सेस प्रतिबंध (Access restrictions), परमिशन लॉजिक, स्क्रिप्टिंग डिक्शनरीमध्ये जावास्क्रिप्टचे एग्झीक्यूशन आणि ब्लूटूथमध्ये चुकीचे कॉन्फिगरेशन इत्यादीमध्ये गडबड आढळली आहे.6 / 7 iPhone 6s आणि नंतरच्या स्मार्टफोन्ससाठी नवीन iOS 15.2 आणि iPad Pro (सर्व मॉडेल्स) साठी iPadOS 15.2 रिलीझ केले गेले आहेत, जे अपडेट करणे खूप महत्वाचे आहे.7 / 7 अॅपलने असा इशाराही दिला आहे की, अपडेट न केल्यास ऑडिओ किंवा इमेज फाइल चोरीला जाऊ शकते. MacBooks साठी, BSSIDs द्वारे डिव्हाइस निष्क्रियपणे ट्रॅक केले जाऊ शकते. आणखी वाचा Subscribe to Notifications