१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 16:17 IST
1 / 810 हजार रुपयांच्या आत एक कंपनी भारतीय ग्राहकांसाठी एक 5G स्मार्टफोन घेऊन आली आहे. किंमतीच्या मानाने यात प्रोसेसर, कॅमेरा आणि एकंदरीतच फोनचा परफॉर्मन्स सोसो असेल असे तुम्हाला वाटत असेल, आम्हालाही सुरुवातीला वाटले होते. परंतू, जेव्हा आम्ही हा फोन जवळपास आठवडाभर वापरला तेव्हा हे सर्व समज दूर झाले की तसेच राहिले... चला पाहुयात या आयटेलच्या ए ९५ स्मार्टफोनचा रिव्ह्यू...2 / 8या itel A95 5G चा लुक एखाद्या प्रिमिअम कंपनीच्या स्मार्टफोन सारखा आहे. यामुळे तुम्ही हातात घेतला व चार लोकांत फिरलात तरी ते कोणता मोबाईल आहे असे औत्सुक्याने विचारतील, असा आहे. वजनाने इतर फोनच्या तुलनेत हलका आहे. यामुळे ज्यांना हातात सारखा फोन लागतो त्यांच्यासाठी हा चांगला आहे. 3 / 8उजव्या बाजुला फिंगरप्रिंट सेन्सर बटन, आवाज कमी जास्त करण्याचे बटन बास एवढीच बटन या फोनवर आहेत. उगाच ती सायलेंट करायला, एआयसाठी दुसरे अशी भाराभर बटने यात दिलेली नाहीत.डाव्या बाजुला सिमकार्ड ट्रे देण्यात आला आहे. खालील बाजुला मध्यभागी टाईप सी चार्जिंग पोर्ट, डाव्या बाजुला ३.५ एमएम जॅक आणि माईक सेन्सर तसेच उजव्या बाजुला स्पीकर देण्यात आले आहेत. स्पीकरचा आवाज ठीकठाक आहे. स्क्रोल करताना थोडा स्लोपणा जाणवतो.4 / 8या फोनमध्ये ६ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेज स्पेस आहे. 4GB चा देखील पर्याय आहे. परंतू, सध्याच्या गुगलच्या लिमिटनुसार अँड्रॉईड १६ साठी सहा जीबी घेणे व्यावहारिक आहे. दोन्ही व्हेरिअंटच्या किंमतीत ४०० रुपयांचा फरक आहे. पाठीमागे ग्लास पॅनेल असून फ्रेम धातूची आहे. यामुळे याची रुंदी ७.८ एमएम एवढी पातळ आहे. कव्हर, चार्जर तुम्हाला बॉक्समध्येच मिळतो. यामुळे हा खर्च देखील वाचणार आहे. 5 / 8आम्ही जवळपास ३ ते चार तास व्हिडीओ पाहिले. यावेळी फोन तापतो का हे देखील तपासले. फोनच्या तापमानात किंचित वाढ होते, म्हणजे तुम्हाला जाणवतही नाही. सध्या कडक उन्हाळा आहे, त्या तापमानात आम्ही व्हिडीओ, लाईट वेट गेम यावर टेस्टिंग केले. 6.67 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सैंपलिंग रेट असल्याने गेमिंग आणि स्क्रोलिंग करताना स्मूथ अनुभव देतो. परंतू, व्हिडिओ पाहताना तुम्हाला तेवढा शार्पनेस पहायला मिळत नाही. नेहमीची रिल्स पाहणे किंवा अन्य कामासाठी ठीकठाक पर्याय आहे. 6 / 8या फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 ऑक्टा कोअर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा प्रोसेसर आपले नेहमीचे टास्क उत्तमरित्या करतो. परंतू, तुम्हाला हेवी गेम वगैरे खेळायचे असतील तर मात्र वरचा प्रोसेसर लागेल. बाकी मल्टीटास्किंगसाठी हा फोन चांगला आहे. याफोनमध्ये ५००० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे, जी जवळपास दीड दिवस बॅटरी बॅकअप देते. १० वॉटचा चार्जर देण्यात आलेला आहे. ० ते १०० चार्ज करण्यासाठी जवळपास अडीज तास लागतात. 7 / 8आयटेलचा ए ९५ चे पाठीमागचे कॅमेरा मॉड्यूल थोडे बाहेर आहे. यामुळे फोन बिना कव्हरचा ठेवला तर थोडा वाकडा तिकडा राहतो. मागे 50 मेगापिक्सल कॅमेरा, एक डेप्थ सेन्सर आणि एक एआय लेन्स आहे. खूप चांगले नाही, खूप वाईटही नाहीत, ठीकठाक फोटो काढता येतात. डिजिटल झूम, ऑटो फ्लॅश, फेस डिटेक्शन आदी फिचर्स आहेत. ड्युअल व्हिडिओ, स्काय इफेक्ट आणि व्लॉग मोडसारखे क्रिएटिव्ह फिचर्सही देण्यात आले आहेत. सर्वात महत्वाचा म्हणजे यात ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे, जो अपेक्षेपेक्षा जास्त चांगले फोटो खेचतो. आम्ही काही सॅम्पल तुम्हाला दाखवत आहोत. 8 / 8सध्या या फोनमध्ये Android 14 देण्यात आली आहे, त्यावर आयटेलची १४ ओएस आहे. काही अॅप प्री इन्स्टॉल आहेत, ती हटविता येतात. सध्या एआयचा जमाना आहे, यामध्ये ऐवाना एआय देण्यात आला आहे. तुम्ही या फोनचा टीव्ही, एसी साठी रिमोट म्हणूनही वापर करू सकता. आजकाल हे फिचर बऱ्याच फोनमध्ये येत नाही. परंतू, रिमोट हरवला किंवा सापडत नसेल तर हे फिचर खूप कामी येते. Ask AI टूल तुम्हाला वेगवेगळी फिचर्स प्रदान करते.