शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Jio 5G in India: रिलायन्स जिओने 5G मधून पुणे, महाराष्ट्राला वगळले? 4G सिमवरच चालणार, किंमत किती? पूर्ण माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2022 1:15 PM

1 / 6
देशात बहुप्रतिक्षित असा 5G स्पेक्ट्रम लिलाव संपला आहे. मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओने सर्वाधिक स्पेक्ट्रम विकत घेतले आहेत. असे असताना जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी १५ ऑगस्टपासून पहिल्या टप्प्यात ५जी सेवा सुरु केली जाणार असल्याचे म्हटले आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार पुण्याला यातून वगळण्यात आले आहे.
2 / 6
म्हणजेच ४जी सुरु करताना जिओने ज्या शहराला पसंती दिली होती, ते पुणेकर ५जी सेवेपासून वंचित राहणार आहेत. Jio 5G रोलआऊट करण्यासाठी खूप आधीपासून प्लॅनिंग करत आहे. यामध्ये ग्रामीण भागातही ५जी सेवा पुरविण्यासाठी जिओने लोवेस्ट बँडचे स्पेक्ट्रम विकत घेतले आहेत. यामध्ये ७०० MHz हा बँड आहे. याचबरोबर जिओची ५जी सेवेची किंमत किती असेल याचीही अंदाजे माहिती समोर आली आहे.
3 / 6
कंपनी संपूर्ण भारत 5G रोलआउटसह 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा करेल, असे रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी म्हटले आहे. Jio 5G 15 ऑगस्टला लॉन्च होऊ शकतो. कंपनी भारतातील काही मेट्रो शहरांसह प्रायोगिक चाचणीद्वारे 5G ची घोषणा करू शकते. प्रायोगिक चाचणीनंतर ही सेवा 2 ते 3 टप्प्यांत देशभरात सुरू केली जाईल.
4 / 6
Jio ने सर्व 22 मंडळांसाठी 5G बँड खरेदी केले आहेत. यामध्ये मुंबई आणि महाराष्ट्र वेगळे सर्कल आहे. एका अहवालानुसार, कंपनीची 5G सेवा सुरुवातीला दिल्ली, मुंबई, कोलकाता, बेंगळुरू, चेन्नई, लखनऊ, हैदराबाद, अहमदाबाद आणि जामनगरसह 9 शहरांमध्ये सुरू होईल. पुणे, चंदीगड, गुरुग्राम आणि गांधीनगर यासारख्या इतर शहरांचा नंतर यात समावेश होऊ शकतो.
5 / 6
याशिवाय Jio ने 1000 हून अधिक शहरांमध्ये 5G कव्हरेज प्लॅनिंग पूर्ण केले आहे. यासाठी जिओने हीट मॅप, थ्रीडी मॅप आणि रे ट्रेसिंग तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. जेव्हा 5G सेवा सुरू होईल तेव्हा 5G सिम देखील उपलब्ध करून दिले जाईल. अद्याप याबाबत जिओने घोषणा केलेली नाही. जर तुमच्याकडे Jio 4G सिम असेल, तर तुम्ही कोणत्याही अडचणीशिवाय किंवा सिम अपग्रेडशिवाय Jio 5G सेवा वापरू शकता.
6 / 6
भारतात Jio चे 5G प्लॅन आणि किंमत काय असेल यावरून चर्चा सुरु आहे. जिओचा 5G प्लॅन 400 ते 500 रुपये प्रति महिना असण्याची अपेक्षा आहे. सध्या जिओ ४जीमधून महिनाकाठी सरासरी १७५ रुपये घेते. ५जी सेवा त्यापेक्षा महाग असण्याची शक्यता आहे. जिओची ५जी सेवा नाही मिळाली तरी पुण्यात एअरटेल ऑगस्ट अखेरीस ५जी सेवा लाँच करेल. यामुळे जिओ नसले म्हणून काय झाले, एअरटेलद्वारे ५जी सेवेचा आनंद घेता येणार आहे.
टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओPuneपुणे