शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दिवाळीपूर्वी 'या' ठिकाणी जिओ 5G सेवा मिळू लागली, पाहा लिस्टमध्ये तुमच्या शहराचे आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 1:26 PM

1 / 7
जिओची (Jio) 5G सेवा या महिन्याच्या सुरुवातीला सादर करण्यात आली होती. सध्या कंपनी जिओ वेलकम ऑफरमध्ये (Welcome Offer) युजर्सना अनलिमिटेड 5G डेटा देत आहे. मात्र, सध्या त्यांची सेवा केवळ निवडक शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे.
2 / 7
कंपनी युजर्सना 5G वापरण्याची संधी Invite च्या माध्यमातून देत आहे. कंपनीने 5G सेवा क्षेत्र देखील वाढवले ​​आहे. म्हणजेच जिओची 5G सेवा इतरही अनेक ठिकाणी उपलब्ध झाली आहे. कंपनीने सुरुवातीला चार शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे. आता आणखी इतर दोन शहरांमध्येही उपलब्ध करून देण्यात आले आहे.
3 / 7
पुढील वर्षी मार्चपर्यंत देशातील बहुतांश शहरे या सेवेशी जोडली जातील, असे कंपनीने म्हटले आहे. तर देशातील बहुतांश भागांमध्ये 2024 पर्यंत जिओ 5G सेवा उपलब्ध होईल. याचे प्लॅन्स किंवा इतर गोष्टींची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
4 / 7
जिओने दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसी येथून 5G सेवा सुरू केली. आता जिओची 5G सेवा चेन्नई आणि राजस्थानमधील नाथद्वारामध्ये सुरू करण्यात आली आहे. म्हणजेच आता जिओची 5G सेवा देशातील 6 ठिकाणी वापरता येणार आहे.
5 / 7
जर तुम्ही दिल्ली, मुंबई, कोलकाता, वाराणसी, चेन्नई किंवा नाथद्वारा येथे राहत असाल तर तुम्ही जिओ 5G वापरू शकता. दरम्यान, आपल्याला यासाठी अतिरिक्त पैसे खर्च करण्याची आवश्यकता नाही.
6 / 7
जर तुमच्याकडे 4G रिचार्ज असेल आणि तुम्हाला कंपनीकडून Invite मिळाले असेल तर तुम्ही 5G सेवा वापरू शकता. यासाठी तुमच्याकडे 5G हँडसेट असणे आवश्यक आहे.
7 / 7
बहुतांश मोबाइल ब्रँड्स 5G असूनही या सेवेला सपोर्ट करत नाहीत. यासाठी, तुमच्या मोबाईल फोनवर ब्रँडद्वारे ओटीए अपडेट जारी केले जाईल. त्यानंतर तुम्ही 5G उपलब्धतेवर आधारित देखील वापरू शकता.
टॅग्स :JioजिओRelianceरिलायन्स5G५जी