jio airtel 5g setting how to enable 5g on a smartphone
फोनमध्ये 'या' सेटिंगशिवाय 5G नेटवर्क मिळणार नाही, असे करा 'ON', जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2022 2:25 PM1 / 7नवी दिल्ली : बऱ्याच प्रतिक्षेनंतर अखेर 5G सेवा भारतात सुरू झाली आहे. परंतु, ही सेवा सध्या केवळ निवडक शहरांमध्येच दिली जात आहे. याचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला वेगळ्या 5G सिमची गरज भासणार नाही. याशिवाय तुम्हाला कोणत्याही प्लॅनची गरज भासणार नाही.2 / 7सध्या एअरटेल (Airtel) 5G सेवा सध्या दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, सिलीगुडी, नागपूर आणि वाराणसी येथे उपलब्ध आहे. तर रिलायन्स जिओची ( Relianace Jio) 5G सेवा दिल्ली, मुंबई, कोलकाता, वाराणसी, चेन्नई किंवा नाथद्वारामध्ये उपलब्ध आहे. 3 / 7पण, एका सेटिंगमुळे तुम्हाला 5G सेवा मिळणार नाही. यासाठी तुम्हाला फोनची 5G सेटिंग ऑन करावी लागेल. डीफॉल्टनुसार 5G बहुतेक डिव्हाइसमध्ये चालू नाही. यासाठी तुम्हाला स्वतःहून ही सेटिंग ऑन करावी लागेल. 4 / 7स्मार्टफोनची बहुतांश सेटिंग सारखीच असते. यामुळे असे ऑप्शन सर्व फोनमध्ये उपलब्ध असतील. मात्र, ऑप्शन मागे- पुढे जाऊ शकतो. सर्वात आधी तुम्हाला तुमच्या 5G स्मार्टफोनची सेटिंग ओपन करावी लागेल.5 / 7फोन सेटिंग ओपन केल्यानंतर तुम्हाला Network & Internet किंवा Wi-Fi & networks सेटिंगमध्ये जावे लागेल. त्यानंतर SIM & Network किंवा Connection & Sharing वर क्लिक करावे लागेल. 6 / 7आता तुम्हाला Network Mode किंवा Preferred network type मधून 5G/LTE/3G/2G किंवा 5G चा ऑप्शन निवडावा लागेल. जर तुम्ही एलिजिबल एरियात राहत असाल आणि इतर क्रायटेरिया पूर्ण केल्यानंतर तुमच्या फोनमध्ये 5G नेटवर्क येण्यास सुरुवात होईल. 7 / 7दरम्यान, अनेक मोबाईल ब्रँड्सनी यासाठी आवश्यक OTA अपडेट जारी केलेले नाहीत. या अपडेटनंतरच तुम्ही एअरटेल 5G किंवा जिओ 5G वापरू शकता. तसेच, फोनचे अपडेट तपासा आणि नवीन अपडेट इन्स्टॉल करा. आणखी वाचा Subscribe to Notifications