शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जियो, एअरटेल, Vi आणि BSNL: कोणत्या कंपनीची 5G सेवा कधी सुरू होणार, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2022 7:11 PM

1 / 5
भारतात अधिकृरित्या 5G सेवा लॉन्च झाली आहे. भारतातील काही प्रमुख शहरांमध्ये नागरिकांना 5G सेवेचा लाभही मिळत आहे. तुम्हीही हाय-स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी असलेल्या 5G सेवेची वाट पाहत असाल. कोणती कंपनी कधीपासून आपली 5G सेवा सुरू करणार, याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
2 / 5
Airtel 5G- एअरटेल देशात 5G सेवा लॉन्च करणारी पहिली कंपनी आहे. एअरटेलने 1 ऑक्टोबरपासून देशातील प्रमुख आठ शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे. दिल्ली, मुंबई, वाराणसी, बंगळूरू, चेन्नई, हैदराबाद, नागपूर आणि सिलीगुडी या शहरांमध्ये 5G सेवा सुरू झाली आहे. कंपनीचे चेअरमन सुनील भारती मित्तल यांनी सांगितल्यानुसार, मार्च 2023पर्यंत देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये 5G सेवा सुरू होईल. तसेच, 2024 पर्यंत देशातील प्रत्येक शहर अथवा गावात 5G सेवा मिळेल.
3 / 5
Jio 5G-रिलायन्स जिओने काही दिवसांपूर्वीच 45व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत(AGM) सांगितले होते की, येत्या दिवाळीपासून ट्रू 5G सेवा सुरू करणार आहे. 24 ऑक्टोबरला दिवाळीच्या दिवशी दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकातामध्ये 5G सेवा सुरू होतील. कंपनीचे चेअरमन आकाश अंबानी यांनी सांगितल्यानुसार, या वर्षाच्या अखेरीस देशातील मोठ्या शहरांमध्ये आणि डिसेंबर 2023 मध्ये संपूर्ण देशात जिओ युजर्स 5G सेवेचा लाभ घेऊ शकतील.
4 / 5
Vodafone Idea (Vi) 5G-इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC) 2022 मध्ये 5G लॉन्चिंगनंतर बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला यांनी कन्फर्म केले की, व्होडाफोन आयडिया (Vi) ची 5G सेवा लवकरच सुरू होईल. यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे, लवरच ग्राहकांना 5G सेवा मिळेल. परंतू, कंपनीने एअरटेल आणि जिओप्रमाणे रोलआउट टाइमलाइन किंवा 5G लॉन्चिंग डेट कन्फर्म केली नाही.
5 / 5
BSNL 5G-सरकारची मालकी असलेली टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने अद्याप 4G रोलआउट प्रक्रिया संपवलेली नाही. परंतू, दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कन्फर्म केले की, BSNL यूजर्ससाठी 5G रोलआउट पुढील वर्षी 15 ऑगस्टपासून सुरू होईल.
टॅग्स :5G५जीAirtelएअरटेलJioजिओBSNLबीएसएनएलVodafoneव्होडाफोनIdeaआयडिया