शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सोशल मीडियावर पोस्ट करताना राहा अलर्ट, नाहीतर नोकरीचे होतील वांदे! कसं जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2022 5:21 PM

1 / 8
सध्या तुम्ही नोकरीसाठी अर्ज करता तेव्हा कंपन्या तुम्हाला तुमच्या सोशल मीडिया हँडल्सची माहिती विचारतात. हे सध्या अगदी सामान्य झालं आहे. पण कंपन्या असं का करतात असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? हेच जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.
2 / 8
ट्रायडंट ग्रुपच्या प्रमुख एचआर ऑफिसर पूजा बी. लुथरा ​​म्हणतात, 'सध्याच्या काळात कंपन्यांकडून उमेदवारांची सोशल मीडिया हँडल्सचं स्क्रीनिंग करणं सामान्य गोष्ट झाली आहे.
3 / 8
लुथरा म्हणाले, 'अनेक कंपन्या सोशल मीडिया पोस्टच्या आधारे उमेदवारांना नाकारतात.' अशा परिस्थितीत सोशल मीडियावर पोस्ट टाकण्यापूर्वी सतर्क राहून आक्षेपार्ह असं काही लिहू नये, असा सल्ला ते देतात.
4 / 8
बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करणाऱ्या Sterling RISQ कंपनीचे एपीएसी प्रेसिडेंट मनीष सिन्हा म्हणाले की, 'सोशल मीडिया अकाऊंटचं स्क्रिनिंग हे तर कोणत्याही कंपनीद्वारे केल्या जाणाऱ्या स्क्रिनिंगचा सामान्य विस्तार आहे. सामान्यतः उमेदवाराचा गुन्हेगारी इतिहास, शिक्षण, नोकरीची पार्श्वभूमी आणि कॉर्पोरेट संस्कृतीशी व्यक्तीचा सुसंवाद याची पडताळणी कंपन्यांकडून केली जाते'
5 / 8
टेलिकॉम, मीडिया, विमा, ग्राहक बँकिंग, स्टाफिंग फर्म, अकाउंटिंग आणि ऑडिट कंपन्या व्हेरिफिकेशनच्या बाबतीत अधिक भर देतात. मनीष सिन्हांच्या मतानुसार पॉवर आणि गॅस, खासगी इक्विटी आणि तंत्रज्ञान कंपन्या देखील सोशल मीडिया स्क्रीनिंगवर खूप भर देतात.
6 / 8
ते म्हणाले की, कंपन्या सामान्यत: कंपन्या उमेदवारांचे लिंक्डइन आणि ट्विटर प्रोफाइल तपासतात. तसंच, फेसबुक आणि इंस्टाग्रामलाही पूर्णपणे टाळता येऊ शकत नाही.
7 / 8
स्टर्लिंगच्या उमेदवारांचे Pinterest, YouTube आणि इतर बातम्यांचे स्रोत देखील तपासले जातात. कंपनीतील उमेदवाराच्या भूमिकेच्या ज्येष्ठतेनुसार, नियुक्ती करणारे व्यवस्थापक उमेदवारांशी संबंधित सर्व माहितीचं संपूर्ण विश्लेषण करतात. 'वरिष्ठ व्यवस्थापन आणि धोरणात्मक पदांसाठी नियुक्ती करताना ही प्रक्रिया अधिक महत्त्वाची बनते कारण येथे कोणत्याही प्रकारची चूक खूप भारी ठरू शकते', असं टॅलेंट स्क्रिमिंग फर्म SHL चे एमडी सुशांत द्विवेदी म्हणाले.
8 / 8
'जर मी चुकीच्या सीईओची नियुक्ती केली तर ते कंपनीला खाली आणू शकते. यामुळे शेअर्सची किंमत देखील खाली येऊ शकते. एकूणच, याचा मोठा परिणाम होऊ शकतो', असं सुशांत द्विवेदी म्हणाले.
टॅग्स :jobनोकरीSocial Mediaसोशल मीडिया