the joker virus is back with these 8 android apps
अँड्रॉइड डिव्हाइसवर पुन्हा Joker व्हायरसचा धोका, 'हे' आठ अॅप्स लगेच करा डिलीट! By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 3:46 PM1 / 8अँड्रॉइड डिव्हाइस युजर्संना पुन्हा सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. आता Joker व्हायरसवरून अलर्ट करण्यात आले आहे. Joker व्हायरस यापूर्वीही चर्चेत आला होता. 2 / 8Joker व्हायरस हा अँड्रॉइड डिव्हाइसवर अटॅक करतो आणि गुगल प्ले स्टोअरवरील बऱ्याच अॅप्समध्ये स्वत:ला लपवतो. बेल्जियन पोलिसांनी (Belgian Police ) याबद्दल अलर्ट केले आहे. 3 / 8या व्हायरसबाबत म्हटले आहे की, कोणत्याही ऑथोराइजेशनच्या पेमेंट सर्व्हिसला सब्सक्राइब करु शकतो. हा मॅलेशियस प्रोग्रॉम 8 प्ले स्टोअर अॅपमध्ये आढळला होता. याला गुगलने आपल्या स्टोअरमधून हटविले होते.4 / 8बेल्जियन पोलिसांनी एक स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की, ज्याबद्दल गेल्या वर्षी Quick Heal Security Labs ने सांगितले होते, ते हे 8 अॅप्स आहेत. अँड्रॉइड युजर्संनी आपल्या स्मार्टफोनमधून हे अॅप्स काढून टाकावे.5 / 8बेल्जियन ऑथोरिटीच्या म्हणण्यानुसार, अजूनही असे बरेच युजर्स आहेत ज्यांच्या फोनमध्ये हे अॅप्स त्यांच्या फोनवर आहेत. हा सर्व Joke मालवेअरचे बळी ठरले आहेत.6 / 8रिपोर्टनुसार, जोकर मालवेअर Auxiliary Message, Element Scanner, Fast Magic SMS, Free CamScanner, Go Messages, Super Message, Super SMS, Travel Wallpapers अॅप्समध्ये आढळला आहे.7 / 8Joker मालवेअर खूप धोकादायक मालवेअर आहे आणि तो सतत अँड्रॉइड डिव्हाइसला लक्ष्य करीत आहे. हा सर्वात आधी 2017 मध्ये डिटेक्टमध्ये आढळला होता. Quick Heal संशोधकाच्या मते, Joker व्हायरस युजर्सचा डेटा कॅप्चर करतो.8 / 8यात एसएमएस, कॉन्टॅक्ट लिस्ट, डिव्हाइस इन्फो, ओटोपी आणि इतर डेटा कॅप्चर केला जातो. या मालवेअरद्वारे तुमचे बँक खाते रिकामे केले जाऊ शकते. आणखी वाचा Subscribe to Notifications