juice jacking scam smartphone charging in public place cut money from bank account rbi issued alert
अलर्ट! स्मार्टफोन चार्ज करताच बँक खातं होतंय रिकामं?; Juice Jacking Scam चा मोठा धोका By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 11:52 AM1 / 10स्मार्टफोन हा जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच त्याचा खूप वापर करतात. पण अनेकदा बॅटरी लो होते. तुम्हीही घरातून बाहेर पडल्यावर सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्जिंगला लावत असाल तर सावध व्हा. 2 / 10तुम्हाला कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. या प्रकरणी भारतीय रिझर्व्ह बँकेनेही लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. काही स्कॅमर्स 'ज्यूस जॅकिंग' स्कॅमद्वारे लोकांना आपल्या जाळ्यात अडकवत आहेत. या स्कॅमबाबत आरबीआयने अलर्टही जारी केला आहे. 3 / 10फायनान्स फील्डमध्ये आर्थिक फसवणुकीवरील आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, ज्यूस जॅकिंग वापरून लोकांची फसवणूक केली जात आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार ज्यूस जॅकिंग स्कॅम हा एक प्रकारचा स्कॅम आहे. याद्वारे सायबर गुन्हेगार मोबाईलमधील महत्त्वाचा डेटा चोरतात. त्यामुळे लोकांचं आर्थिक नुकसान होऊ शकतं.4 / 10ज्यूस जॅकिंग स्कॅम ही अशीच एक पद्धत आहे ज्यामध्ये सायबर क्रिमिनल्स मोबाईल आणि लॅपटॉप यांसारख्या उपकरणांमधून महत्त्वाचा डेटा चोरण्याच्या पद्धतींचा अवलंब करतात. असा स्कॅम करण्यासाठी, सायबर गुन्हेगार पब्लिक चार्जिंग स्टेशनवर मालवेअरने भरलेले सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर इन्स्टॉल करतात. 5 / 10हे सायबर गुन्हेगार सार्वजनिक चार्जिंग स्टेशन, जसं की यूएसबी पोर्ट किंवा चार्जिंग किऑस्कद्वारे लोकांना जाळ्यात अडकवतात. मोबाईलच्या चार्जिंग पोर्टचा उपयोग फाइल/डेटा ट्रान्सफरसाठी केला जाऊ शकतो. 6 / 10सायबर क्रिमिनल्स तेथे कनेक्ट केलेल्या फोनमध्ये मालवेअर ट्रान्सफर करण्यासाठी सार्वजनिक चार्जिंग पोर्टचा वापर करतात. एखाद्या व्यक्तीच्या मोबाइलवरून ईमेल, एसएमएस आणि पासवर्डवर कंट्रोल करतात. यानंतर डेटा चोरीला जातो.7 / 10स्कॅमर सर्वप्रथम सार्वजनिक चार्जिंग स्टेशनवर मालवेअरने भरलेले सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर सेट करतात. त्यासाठी ते सहसा एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन किंवा गर्दीची ठिकाणं निवडतात. स्कॅमरनंतर चार्जिंग स्टेशनला 'फ्री चार्जिंग' स्टेशन म्हणून लेबल करू लावतात. मोफतचे लेबल पाहून अधिकाधिक युजर्स मोहात पडू शकतात.8 / 10मग स्कॅमर्स फसवणूक करतात. य़ुजर्स USB केबलद्वारे डिव्हाइसला चार्जिंग स्टेशनशी कनेक्ट करताच, इन्स्टॉल केलेला मालवेअर युजर्सचा डेटा चोरतो. स्कॅमर कनेक्ट केलेल्या उपकरणांमधून पासवर्ड, फोटो आणि बँकिंग माहिती यासारखा खासगी डेटा चोरतो.9 / 10युजरने सार्वजनिक ठिकाणी फोन चार्ज करणे टाळावे. घराबाहेर पडताना, गर्दीच्या ठिकाणी असलेल्या मोफत चार्जिंग स्टेशनपासून लांब राहा. तुमच्या फोनची बॅटरी लवकर लो झाली तर त्यासाठी तुम्ही तुमची स्वतःची पॉवरबँक वापरू शकता. 10 / 10एवढेच नाही तर सार्वजनिक वायफायचा वापर करणंही प्रकर्षाने टाळा. तुमचं डिव्हाइस अप टू डेट ठेवा. फोनमध्ये लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल यानुसार सेटिंग करा. यासोबतच फोनमध्ये मालवेअर डिटेक्ट करणार App इन्स्टॉल करा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications