शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Aadhar Card सुरक्षित कसे करावे? ‘या’ सोप्या पद्धतीने करा घरबसल्या लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2021 2:47 PM

1 / 15
आधारकार्ड (Aadhaar Card) आताच्या घडीला बंधनकारक झालं आहे. मोबाइलसाठी सीमकार्ड घ्यायचं असो किंवा बँकेतील एखादे काम असो, आधारकार्डाशिवाय कोणतेच काम पुढे जाऊ शकत नाही. सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कोणत्याही कंपनीत वा संस्थेत आधारकार्डाशिवाय पान हलत नाही.
2 / 15
ओळखपत्र म्हणून Aadhaar Card चे महत्त्व नजीकच्या काळात अधिक वाढणार असल्याचे सांगितले जाते. अशा परिस्थितीत आपले आधारकार्ड सुरक्षित आहे की नाही, याची खात्री करून घेणे उपयुक्त मानले जाते.
3 / 15
डिजिटल व्यवहाराचे प्रमाण वाढल्यापासून गुन्हेगारीचे स्वरुपही वाढायला लागले आहे. Aadhaar Card हे महत्त्वाचे दस्तऐवज असल्यामुळे त्याचा दुसऱ्याकडून तर वापर केला जात नाही ना, याची पडताळणी करणे आवश्यक झाले आहे.
4 / 15
अशा परिस्थितीत Aadhaar Card चुकीच्या हातात गेले तर खासगी माहिती लिक होण्याचा धोका वाढतो. ही समस्या दूर करण्यासाठी युआयडीएआयने एक विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे, ज्याद्वारे आपण आधार कार्ड लॉक करू शकता.
5 / 15
Aadhaar Card लॉक करण्यासाठी आपल्या फोनवरून GETOTP लिहून १९४७ वर मॅसेज पाठवा. आता आपल्याकडे ओटीपी असेल, LOCKUID आधार क्रमांक पाठवा आणि पुन्हा १९४७ वर पाठवा.
6 / 15
ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपला Aadhaar Card नंबर लॉक होईल. एकदा आधार कार्ड लॉक झाल्यावर आपल्या परवानगीशिवाय कोणीही ते वापरू शकणर नाही. हॅकर्स देखील आधार पडताळणी करू शकणार नाहीत.
7 / 15
युआयडीएआयच्या या सुविधेमुळे आपले Aadhaar Card संरक्षित केले जाईल. मात्र, लॉक केलेले आधार कार्ड अनलॉक करण्याची सुविधाही युआयडीएआयकडून उपलब्ध करण्यात आली आहे.
8 / 15
Aadhaar Card अनलॉक करण्यासाठी आपल्या फोनवरून १९४७ पर्यंत GETOTP आधार नंबर लिहा. ओटीपी आल्यानंतर त्या अनलॉकयूआडी आधार क्रमांकावर लिहा आणि ते पुन्हा १९४७ क्रमांकावर पाठवा.
9 / 15
असे केल्याने आपले आधार कार्ड अनलॉक होईल. ही प्रक्रिया UIDAI च्या संकेतस्थळावर जाऊनही ही प्रक्रिया पार पाडली जाऊ शकते. यासाठी Aadhaar Card सेवा पर्यायांमधील लॉक/अनलॉक बायोमॅट्रिकवर क्लिक करावे.
10 / 15
चेकबॉक्सला सिलेक्ट करावे. यानंतर १२ अंकी Aadhaar Card क्रमांक सादर करून कॅप्चा भरावा. यानंतर मोबाइलवर ओटीपी येण्यासाठी क्लिक करावे. यानंतर नोंदणीकृत मोबाइलवर ओटीपी येईल. तो सादर केला की, Enable locking feature करावे. यानंतर तुमचे आधार कार्ड लॉक होईल.
11 / 15
लॉक झालेले Aadhaar Card अनलॉक करण्यासाठी हीच पद्धत फॉलो करावयाची आहे. केवळ disable locking feature हा पर्याय सिलेक्ट करावायचा आहे. यानंतर लॉक झालेले आधार कार्ड अनलॉक होऊ शकेल.
12 / 15
दरम्यान, आपण आपल्या मुलाचे Aadhaar Card बनवत असल्यास, नोंदणीमधील प्रत्येक माहिती योग्य असावी. आधार कार्ड जारी करणार्‍या यूआयडीएआय या संस्थेने ट्विट केले आहे. आपल्या मुलाचा आधार डेटा योग्य आहे, याची खात्री करुन घ्या.
13 / 15
इंग्रजीमध्ये नोंद झालेल्या तपशीलांचे शब्दलेखन काळजीपूर्वक तपासा. स्लिपमध्ये आपण ते पुन्हा तपासू शकता. पूर्ण समाधान झाल्यावरच स्वाक्षरी करा. यासह जन्म तारखेशी संबंधित माहिती Aadhaar Card मध्ये योग्यरित्या भरली जाते, फॉर्म सबमिट करण्यापूर्वीच तपासा.
14 / 15
यूआयडीएआयचा हा सल्ला प्रौढ व्यक्तीस देखील लागू आहे. याचा अर्थ असा की, Aadhaar Card नोंदणीच्या वेळी ऑपरेटरने अचूक माहिती प्रविष्ट केली आहे हे सुनिश्चित करा.
15 / 15
सर्व खबरदारी घेतल्यानंतर, Aadhaar Card मधील प्रविष्ट केलेला तपशील चुकला, तर आपण घरी बसून बहुतेक तपशील दुरुस्त करू शकता.
टॅग्स :Adhar Cardआधार कार्डtechnologyतंत्रज्ञान