know about how to change name and unlist mobile number in truecaller app
Truecaller वर नाव बदलणे, डिलीट करणे व नंबर अनलिस्ट करणे झाले सोपे; पाहा स्टेप्स By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 7:24 PM1 / 10एखाद्या नंबरवरून आपल्याला फोन आल्यास, त्याविषयीची माहिती देणारे काही अॅप्स बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, त्यात Truecaller सर्वांत आघाडीवर आणि लोकप्रिय आहे. 2 / 10आधुनिक तंत्रज्ञानामुळे मोबाइल अधिक स्मार्ट होत चालले आहेत. एखाद्याने तुम्हाला फोन केला तर Truecaller वर त्याचे नाव येते. अनेकदा तुमच्या मोबाइलमध्ये एखाद्या व्यक्तीचे नाव सेव्ह नसेल तरी ट्रू कॉलरमुळे आपल्याला लगेच माहिती होते. 3 / 10मात्र, Truecaller वर तुम्हाला ओळख लपवायची असेल, नावात बदल करायचा असेल, नाव डिलीट करायचे असेल, इतकेच नव्हे, तर नंबर अनलिस्ट करायचा असेल, तर आता सोप्या पद्धतीचा अवलंब करून काही सुलभ स्टेप्समध्ये आपण ते करू शकतो. जाणून घ्या वन बाय वन ईझी स्टेप्स... (how to change name and unlist mobile number in truecaller app)4 / 10नाव बदलायचे असेल, तर अँड्रॉयड आणि iOS फोनवर सर्वात आधी Truecaller अॅपवर जा. या ठिकाणी आपल्याला प्रोफाइल दिसेल. यानंतर Edit your Profile पर्यायावर टॅप करा. आपले नाव पहिले नाव आणि आडनाव दिसेल. त्यात बदल करून त्या ठिकाणी जे नाव ठेवाल, तेच ट्रूकॉलरवर दिसेल.5 / 10ज्यावेळी ही प्रोसेसर पूर्ण होईल तेव्हा सेव्ह पर्यायावर टॅप करावे लागेल. त्यानंतर तुमची माहिती सेव्ह होईल. तसेच तुम्ही तुमचे नाव डेस्कटॉप द्वारेही बदलू शकता. यासाठी Truecaller ची वेबसाइटवर जाऊन प्रोसेस करावी लागेल.6 / 10Truecaller वर नंबर बदलणेही सोपे झाले आहे. सर्वप्रथम अॅपवर जावे. यानंतर सेटिंग्स वर टॅप करा. पुन्हा Privacy Centre वर जा. या ठिकाणी डिअॅक्टिव पर्यायावर टॅप करा. या ठिकाणी नंबर डिलीट करायचा की ठेवायचा हे तुम्ही ठरवू शकता. याला निवडल्यानंतर अकाउंटला डिअॅक्टिवेट करा.7 / 10Truecaller वरून आपला नंबर अनलिस्ट करण्यासाठी Truecaller च्या अनलिस्ट पेज वर जा. यानंतर आपला मोबाइल नंबर आणि कंट्री कोड टाका. यानंतर अनलिस्ट पर्यायावर जा. पुन्हा एकदा अनलिस्ट करण्याचे कारण सांगा.8 / 10यानंतर CAPTCHA एंटर करा. पुन्हा Unlist पर्याय निवडा. यानंतर २४ तासात Truecaller वरून अनलिस्ट केले जाईल. यानंतर सेव्ह पर्यायावर क्लिक करा. हा सर्व बदल दोन दिवसांनंतर दिसेल.9 / 10दरम्यान, स्वीडनची कंपनी असलेल्या Truecaller ने नवीन अॅप लॉन्च केले आहे. या नवीन अॅपचे नाव Guardians असे ठेवण्यात आले आहे. हे अॅप मोफत डाऊनलोड करता येऊ शकते. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विशेषतः महिला सुरक्षेसाठी हे अॅप तयार करण्यात आले आहे, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. 10 / 10स्वीडन आणि भारतातील टीमने १५ महिन्यांच्या कालावधीत संयुक्तपणे हे अॅप डेव्हलप केल्याचे Truecaller कडून सांगण्यात आले आहे. हे अॅप बॅकग्राउंडला काम करत असल्यामुळे बॅटरीची बचत होते, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications