शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोबाइलमधील इंटरनेट खूपच स्लो चालतंय? ‘असा’ वाढवा स्पीड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 1:13 PM

1 / 12
कोरोना संकटाच्या कालावधीपासून इंटरनेटची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. तसेच डिजिटल व्यवहारांमध्येही मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
2 / 12
भारतात इंटरनेट युझर्सचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. देशात 4G चा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. देशात अनेक ठिकाणी अद्यापही 3G आणि 2G सेवा सुरू आहे.
3 / 12
मात्र, अनेकदा मोबाइलमधील इंटरनेट आपल्याला अपेक्षित स्पीड देत नाही. मोबाइल नेटवर्क फुल्ल असतं. मात्र, इंटरनेट स्पीड अगदीच स्लो असल्याची तक्रार अनेक युझर्स करत असतात. (mobile internet speed)
4 / 12
आपल्या मोबाइलमधील सीमकार्ड ४जी असेल तरीही, आपल्याला वेगवान इंटरनेट किंवा उत्कृष्ट डेटा स्पीड मिळत नसेल. तथापि, वेगवान इंटरनेट स्पीड मिळविण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाइल सेटिंग्जमध्ये काही बदल करावे लागतील.
5 / 12
इंटरनेटचा स्पीड वाढवण्यासाठी आपण काही उपाय करून पाहू शकता. सर्वप्रथम मोबाईलचे सॉफ्टवेअर अप टू डेट आहे का? याची खात्री करा. मोबाईल रॅम क्लीन करत रहा.
6 / 12
व्हिपीएन सर्व्हिस तात्पुरती बंद करा. मोबाईलचे नोटीफीकेशन्स बंद करुन टाका. तसेच आपल्या भागात कोणत्या कंपनीच्या सीमकार्डला चांगले नेटवर्क आणि अधिक इंटरनेट स्पीड आहे, याची खात्री करून घ्या.
7 / 12
तुम्हीही त्या कंपनीचे सीमकार्ड घ्या. नवे सीमकार्ड घेणं शक्य नसेल, तर सध्या वापरात असलेले सीमकार्ड त्या कंपनीमध्ये पोर्ट करून घ्या.
8 / 12
आपल्या मोबाइलमधील सीमकार्ड ४जी अपग्रेड आहे ना, याची खातरजमा करून घ्या. सीमकार्ड ३जी असेल, तर त्यावर ४जी चालवण्याचा हट्ट धरू नका.
9 / 12
ब्राऊझरमध्ये प्रायव्हेट मोड वापरु नका. ब्राऊझरमध्ये गरज नसेल तेव्हा ‘ईमेज डाऊनलोड’ हा पर्याय बंद करुन ठेवा. ब्राऊझरमध्ये व्हॉईस कमांडद्वारे ईनपुट देत बसण्यापेक्षा बोटांनी टाईप करण्याचा प्रयत्न करा.
10 / 12
युट्यूबवर व्हिडीओ पाहताना केवळ आवाज ऐकणे आवश्यक असेल तर व्हिडीओचे रिझॉल्युशन कमीत कमी ठेवा. तुम्ही ज्या वेबसाईट्स दररोज वापरता, त्या वेबसाईट्स फेव्हरेटमध्ये ॲड करून ठेवा.
11 / 12
अशा काही सोप्या आणि सहज गोष्टी करून आपण आपल्या मोबाइलमधील इंटरनेटचा स्पीड वाढवू शकता, असे सांगितले जाते.
12 / 12
रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया, अशा कंपन्यांकडून ४जी सीम ऑफर केले जाते. आपले सीमकार्ड ४जी नसेल, तर ते अपग्रेड करून घ्यावे.
टॅग्स :MobileमोबाइलInternetइंटरनेटSmartphoneस्मार्टफोन