शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Tata Sky युजर्ससाठी गुड न्यूज! सेट टॉप बॉक्सच्या किंमतीत कपात; पाहा, डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2021 6:08 PM

1 / 10
गेल्या काही वर्षांमध्ये DTH ची सेवा देणाऱ्या कंपन्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अनेक प्रकारच्या कंपन्या ही सर्व्हिस देतात. कोट्यवधी ग्राहक याचा लाभ घेतात. यातील आघाडीचे नाव म्हणजे Tata Sky.
2 / 10
तुम्हीही कमी किंमतीमध्ये एखाद्या कंपनीचा सेट-टॉप बॉक्स खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आनंदाची बातमी आहे. Tata Sky ने आपल्या तीन सेट-टॉप बॉक्सवर जबरदस्त ऑफर आणली आहे. तुम्हाला अँड्रॉइड सेट-टॉप बॉक्स पाहिजे असेल तर तुम्ही Tata Sky Binge+ खरेदी करु शकता.
3 / 10
याशिवाय Tata Sky चे SD, HD, HD 4K किंवा Tata Sky+ HD असेही सेट-टॉप बॉक्स उपलब्ध असून, कमी किमतीत खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे.
4 / 10
टेलिकॉम टॉकच्या एका रिपोर्टनुसार, Tata Sky ने आपल्या सेट-टॉप बॉक्सची किंमत कमी केली आहे. कंपनीने आपल्या सर्व पॉप्यूलर सेट-टॉप बॉक्सच्या किंमतीत कपात केली आहे. जास्तीत जास्त युजर्संना या ऑफरचा फायदा मिळायला हवा, यासाठी कंपनीने हे पाउल उचलल्याचे सांगितले जाते.
5 / 10
Tata Sky Binge+ सेट-टॉप बॉक्सची मूळ किंमत २,४९९ रुपये आहे. मात्र, कंपनी या बॉक्सवर २ हजार रुपयांची सूट देत आहे. डिस्काउंट सोबत सेट टॉप बॉक्स खरेदी करण्यासाठी युजर्संना TSKY200 या कोडचा वापर करावा लागणार आहे.
6 / 10
Tata Sky बिंज+ सेट-टॉप-बॉक्सवर युजर्सना सर्व लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा अॅसेस ऑफर देण्यात येत आहे. युजर पाहिजे तेव्हा रिमोटद्वारे अँड्रॉइड टीव्हीवरून सॅटेलाइट टीव्ही स्विच करु शकतात. याशिवाय, कंपनी या बॉक्ससोबत ग्राहकांना एका महिन्यासाठी मोफत सर्व्हिसची ऑफर देत आहे.
7 / 10
Tata Sky HD/SD सेट-टॉप बॉक्सची मूळ किंमत एक हजार ४९९ रुपये आहे. ऑफरअंतर्गत यावर 150 रुपयांची सवलत देण्यात येत आहे. डिस्काउंटसाठी ग्राहकांना ‘TSKY150’ कोडचा वापर करावा लागेल. यानंतर हा बॉक्स एक हजार २४९ रुपयांत खरेदी करता येऊ शकेल.
8 / 10
Tata Sky च्या या सेट-टॉप बॉक्स युजर्स एचडी क्वॉलिटीचे कंटेट पाहू शकतात. या बॉक्सचे आणखी एक खास वैशिष्ट्ये यात डॉल्बी सराउंड साउंडचे सपोर्ट मिळते. टाटा स्काइ+ HD सेट-टॉप-बॉक्सच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे.
9 / 10
Tata Sky+ HD 4K सेट-टॉप बॉक्सची मूळ किंमत ४,९९९ रुपये आहे. ऑफरअंतर्गत डिस्काउंट मिळवण्यासाठी ग्राहकांना ‘TSKY400’ कोडचा वापरन करावा लागेल. यानंतर हा सेट-टॉप बॉक्स ४ हजार ५९९ रुपयांमध्ये मिळू शकेल.
10 / 10
Tata Sky च्या या बॉक्ससोबत कंपनी ६२५ तासांपर्यंत लाइव टीव्ही कॉन्टेंट ऑफर करीत आहे. यात एक खास फीचर देण्यात येत आहे. त्याद्वारे युजर आपली आवडती वेबसीरिज सेट-टॉप-बॉक्सच्या स्टँड बाय मोडमध्ये रेकॉर्ड करु शकतात. या सेट-टॉप बॉक्सचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे युझरला एकाचवेळी तीन शो रेकॉर्ड करता येतात.
टॅग्स :TataटाटाDTHडीटीएच