know about these are the best alternative apps for whatsapp
Whatsapp ला पर्याय काय? 'हे' आहेत उत्तम अॅप्स; मिळतील एकापेक्षा एक फीचर्स By देवेश फडके | Published: January 13, 2021 5:04 PM1 / 10Whatsapp ने आणलेल्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीवर कोट्यवधी युझर्स नाराज आहेत. हजारो युझर्सने व्हॉट्सअॅपला रामराम केले आहेत. तर, आणखी हजारो युझर्स त्या तयारी आहेत. मात्र, Whatsapp ला कोणते चांगले पर्याय आहेत. याबाबत अद्यापही अधिक माहिती युझर्सना नाही.2 / 10इंस्टंट मेसेजिंग अॅप असलेल्या Whatsapp ने गेल्या काही वर्षांत सोशल मीडियावर चांगलाचा जम बसवला आहे. अनेक कारणांसाठी व्हॉट्सअॅपचा वापर करण्यात येतो. केवळ कौटुंबिक नाही, तर व्यवसायिक कारणांसाठीही व्हॉट्सअॅपचा सढळहस्ते वापर वाढल्याचे दिसून आले आहे. मात्र, Whatsapp च्या वर्चस्वाला कुठेतरी धक्का लागत असल्याचे नवीन प्रायव्हसी पॉलिसीच्या निमित्ताने पाहायला मिळत आहे. 3 / 10नवीन प्रायव्हसी पॉलिसीनंतर जगातील श्रीमंत आणि दिग्गज व्यक्तींना व्हॉट्सअॅप सोडण्याचे आवाहन केले आहे. याला कोट्यवधी युझर्सनी प्रतिसाद दिला आहे. यानंतर आता व्हॉट्सअॅपला चांगले पर्याय कोणते आहेत, यावर चर्चा रंगू लागल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया... 4 / 10आताच्या घडीला सर्वांचा ओढा सिग्नल अॅपकडे वाढला आहे. सिग्नल अॅप हे सुरक्षित मेसेजिंग अॅप असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये व्हिडिओ आणि व्हॉइस कॉलची सुविधाही देण्यात आली आहे. हे अॅप मोफत असून, वापरायलाही अत्यंत सोपे आहे. यामध्ये प्रत्येक मेसेज इनक्रिप्ट करून समोरच्या व्यक्तीला पाठवला जातो. गेल्या आठवड्यात जगातील सर्वांत श्रीमंत असलेल्या इलोम मस्क यांनी ट्विटरवरून सिग्नल अॅप वापरण्याचे आवाहन केले होते. 5 / 10Whatsapp ला दुसरा उत्तम पर्याय म्हणजे टेलिग्राम असल्याचे सांगितले जाते. आजच्या घडीला सर्वांत लोकप्रिय अॅपमध्ये टेलिग्रामची गणना केली जाते. कोट्यवधी युझर्सनी हे अॅप डाऊनलोड केले आहे. मोबाइल, टॅबलेट आणि कम्प्युटर अशा तीनही प्लॅटफॉर्मवर हे अॅप वापरता येते. हे अॅप वापरायला सोपे आणि सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे. टेलिग्राममध्ये अॅनिमिटेड इमोजी, जीआयएफ फाइल्स, मल्टिमीडिया फाइल्स शेअर करता येते. यामध्ये व्हॉइस कॉलची सुविधाही देण्यात आलेली आहे. एकावेळी हजार लोकांचा ग्रुप किंवा एखाद्या विषयावर मते जाणून घेण्याचा पर्याय यात देण्यात आला आहे. 6 / 10वायबर हे एक मेसेज आणि व्हाइस कॉल्ससाठी एन्ड टू एन्ड एनक्रिप्शन उपलब्ध करते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, सुरक्षिततेसाठी नवीन व्हर्जनचा वापर केला जात आहे. व्हॉट्सअॅपप्रमाणे याची चॅट्स सुद्धा गुगल ड्राइव्ह वर घेता येऊ शकतात. या ठिकाणी आपली चॅट्स रिस्टोर करण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे. 7 / 10Whatsapp ला टक्कर देण्यासाठी भारतीय बनावटीचे नमस्ते भारत अॅप आणले आहे. हे व्हॉट्सअॅपसारखे काम करते. या अॅपमध्ये व्हाइट बोर्डची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हे अॅप वापरायला सोपे असून, व्हॉइस आणि व्हिडिओ कॉलची सुविधा देण्यात आली आहे. एखादी मीटिंगही या अॅपच्या माध्यमातून आयोजित केली जाऊ शकते. सुरक्षिततेच्या अनुषंगाने यामध्ये एन्ड टू एन्ड एनक्रिप्शन देण्यात आले आहे. 8 / 10एलिमेंट हे एक अँड्रॉइड, आयओएस, विंडोज, मॅक ओएस आणि लिनक्स सॉफ्टवेयरवर काम करते. यामध्ये एक एन्ड टू एन्ड एनस्क्रिप्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. या अॅपमध्ये अडवान्स्ड कम्यूनिकेशन टूल्स दिले आहेत. याद्वारे फाइल शेयर केली जाऊ शकते. तसेच व्हिडिओ चॅटसह स्क्रीन शेयर केली जाऊ शकते.9 / 10डिस्कोर्ड हे अॅप ऑनलाइन गेम्स खेळणाऱ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. मात्र, या अॅपचा मेसेजिंग, चॅटिंग करण्यासाठीही वापर केला जाऊ शकतो. यामध्ये एन्ड टू एन्ड मेसेज पाठवण्याची सुविधा आहे. तुम्हाला आवड असलेल्या क्षेत्राची माहिती इंटरेस्ट या पर्यायाच्या माध्यमातून घेऊ शकता. यासह अनेक उत्तमोत्तम पर्याय, सुविधा या अॅपमध्ये देण्यात आल्या आहेत. 10 / 10सदर सर्व अॅप्स मोफत असून, अँड्रॉइड, आयओएस प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. याशिवाय अधिक सुरक्षिततेसाठी थ्रीमा, वायर आणि सेशनसारखे अॅप उपलब्ध आहेत. मात्र, त्यासाठी पैसे मोजावे लागतील. थ्रीमा अॅपसाठी २७० रुपयांची शुल्क द्यावे लागते. या अॅपमध्ये युजर्सला टेक्स्ट आणि व्हाइस मेसेजेससह व्हाइस आणि व्हिडिओ कॉल करता येऊ शकते. आणखी वाचा Subscribe to Notifications