know about which telecom company has fastest network in terms of calling as per trai
मस्तच! 'ही' कंपनी ठरतेय कॉलिंगसाठी सर्वांत बेस्ट; जाणून घ्या डिटेल्स By देवेश फडके | Published: February 21, 2021 6:51 PM1 / 10दिवसेंदिवस मोबाइलधारकांची संख्या वाढत चालली आहे. बहुतांश युझर्सकडे एकाचवेळी दोन कंपन्यांचे वेगवेगळे नंबर असल्याचे पाहायला मिळते. नवीन मोबाइल घेणाऱ्यांना नेहमी कोणत्या कंपनीचे सीम घ्यावे हा प्रश्न हमखास पडत असतो.2 / 10मोबाइल वापरकर्त्याला चांगल्या सुविधा मिळत नसतील, तर तोदेखील नवीन कंपनीची सेवा घेण्याचा विचार करत असतो. आताच्या घडीला चांगली सेवा कंपनी कोणती विचारले, तर अनेकांकडून अनेकविध पर्याय सांगितले जातात.3 / 10टेलिकॉम क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमुळे कंपन्या आपल्या युझर्ससाठी विविध आकर्षक ऑफर आणत असतात. मात्र, कॉलिंगचा चांगला अनुभव युझर्सना मिळतोच असे नाही. कॉल क्वालिटीच्या बाबतीत कोणती कंपनी सर्वांत बेस्ट आहे, यासंदर्भातील एक अहवाल भारतीय दूरसंचार नियामक मंडळाकडून (TRAI) देण्यात आला आहे. 4 / 10जिओच्या प्रवेशानंतर एअरटेल, वोडाफोन आणि आयडियाला मोठा झटका बसला होता. परंतु, त्यानंतर वोडाफोन आणि आयडियाने एकत्र येऊन जिओ आणि एअरटेलला मोठा धक्का दिला. जानेवारी २०२१ मध्ये वोडाफोन-आयडियाचे कॉलड्रॉप ४.४६ टक्के होते.5 / 10याच कालावधीत जिओचे कॉल ड्रॉप ७.१७ टक्के आणि एअरटेलचे कॉल ड्रॉप ६.९६ टक्के होते. सर्वाधिक कॉलड्रॉप BSNL चे असून, ते ११.५५ टक्के असल्याचे ट्रायच्या अहवालातून समोर आले आहे.6 / 10जानेवारी २०२१ च्या आकडेवारीनुसार आयडियाची व्हॉइस कॉल क्वॉलिटी सर्वांत उत्तम असल्याचे ट्रायच्या अहवालात म्हटले आहे. आयडिला या विभागात ५ पैकी ४.८ रेटिंग मिळाले आहे. तर व्होडाफोनला ५ पैकी ४.२ रेटिंग मिळाले आहे.7 / 10व्हॉइस कॉल क्वॉलिटीच्या बाबतीत जिओ आणि एअरटेल या दोन्ही कंपन्यांना ५ पैकी ३.९ रेटिंग मिळाले आहे. तर BSNL ला ३.८ रेटिंग मिळाले आहे. 8 / 10इनडोअर कॉल क्वॉलिटीसाठी Vi ला ४.२ रेटिंग आणि आऊटडोअर कॉल क्वालिटीसाठी ४.१ रेटिंग मिळाले आहे. Jio ला इनडोअर कॉल क्वॉलिटीसाठी ४.० तर आउटडोअर कॉल क्वॉलिटीसाठी ३.७ रेटिंग मिळाले आहेत.9 / 10Airtel ला इनडोअर आणि आऊटडोअर कॉल क्वालिटीसाठी ३.९ रेटिंग देण्यात आले आहे. युझर्सने दिलेल्या फिडबॅकवरून TRAI ने हा अहवाल सादर केला आहे. 10 / 10डिसेंबर २०२० मध्ये Vi ला ५६ लाख युझर्सनी सोडचिठ्ठी दिली असून, याच कालावधीत Airtel ने ४० लाख नवीन युझर्स जोडले आहेत. Jio ला डिसेंबर २०२० मध्ये केवळ ४.८७ लाख युझर्स जोडता आले, असे सांगितले जात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications