know about this is world most popular android smartphone in the year of 2020
Apple नाही, OnePlus नाही, Xiaomi तर नाहीच; 'या' स्मार्टफोनची सर्वाधिक विक्री By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2021 8:36 PM1 / 10आताच्या घडीला स्मार्टफोन्सच्या क्षेत्रात चुरस असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, याचा फायदा ग्राहकाला मिळताना दिसत आहे. दिवसेंदिवस तीव्र होत गेलेल्या स्पर्धेमुळे कमी बजेटमध्ये उत्तमोत्तम सुविधा असलेले स्मार्टफोन्स उपलब्ध करून दिले जात आहेत. (know about this is world most popular android smartphone in the year of 2020)2 / 10शाओमी, वनप्लस, ओप्पो, सॅमसंग, व्हिवो आणि आसुस यांसारखे जगभरातील अनेक मोठे ब्रँड्स भारतात अनेकविध सुविधा असलेले स्मार्टफोन्स उपलब्ध करून देत आहेत. मात्र, सन २०२० मध्ये सर्वाधिक विक्रीचा स्मार्टफोन कोणता ठरलाय, याची उत्सुकता तुम्हाला लागली असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी खास ठरू शकेल. 3 / 10जगातील बहुतांश स्मार्टफोनमध्ये अँड्रॉयडचा वापर करण्यात येतो. Apple ची स्वतःची ऑपरेटिंग सिस्टम आहे. Omdia कडून एक अहवाल जारी करण्यात आला आहे. या अहवालात सन २०२० मधील सर्वाधिक लोकप्रिय १०० स्मार्टफोनची यादी देण्यात आली आहे. 4 / 10Omdia च्या अहवालानुसार, iOS प्रणालीवर चालणाऱ्या आयफोन 11 ची गतवर्षात सर्वाधिक विक्री झाली आहे. तर अँड्रॉइड प्रणालीवर चालणाऱ्या सॅमसंगने २०२० मध्ये गॅलेक्सीच्या २.३२ कोटी युनिट्सची विक्री करण्यात आली आहे. Omdia कडून जाहीर करण्यात आलेल्या स्मार्टफोन्सच्या यादीत पाच अँड्रॉइड फोन आणि पाच आयफोन आहेत. 5 / 10या अंड्रॉयड स्मार्टफोन्सपैकी चार सॅमसंग आणि एक शाओमीचा स्मार्टफोन आहे. आयफोनने बेस्ट सेलिंग स्मार्टफोन कंपनी होण्याचा बहुमान दुसऱ्यांदा मिळवला आहे.6 / 10सन २०२० मध्ये सर्वाधिक विक्री झालेल्या स्मार्टफोन्सच्या यादीत सॅमसंग कंपनीने बाजी मारली असून, Samsung Galaxy A51 हा स्मार्टफोन सर्वाधिक विक्री झालेला स्मार्टफोन ठरला आहे. 7 / 10Samsung Galaxy A51 या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड १० वर आधारित प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 6.5 इंचाचा फुल एचडी सुपर अमोलेड इनफिनिटी ओ डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये तुम्हाला ऑक्टा कोर एग्जिनॉस ९६११ प्रोसेसर देण्यात आला आहे. 8 / 10Samsung Galaxy A51 मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर सह 8 जीबी पर्यंत रॅम देण्यात आला आहे. ट्रिपल कॅमेरा सेटअप असलेल्या या स्मार्टफोनमध्ये प्रायमरी कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा असून, यासह १२ मेगापिक्सल आणि ५ मेगापिक्सल मायक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी कॅमेराबद्दल बोलायचे झाले, तर या स्मार्टफोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 9 / 10Samsung Galaxy A51 या स्मार्टफोनला ४ हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. याची किंमत २० हजार ९९९ रुपयांपासून सुरू होते. या स्मार्टफोनमध्ये डेडिकेटेड मायक्रो एसडी कार्ड स्लॉटसह डुअल सिम सपोर्ट देण्यात आला आहे. 10 / 10दरम्यान, Apple ने आयफोन 11 च्या ६४.८ मिलियन युनिट्स शिप केले आहेत. शाओमी, वनप्लस, ओप्पो, सॅमसंग आणि व्हिवो यांसारखे जगभरातील अनेक मोठे ब्रँड्स त्यांच्या फोनमध्ये अँड्रॉयड ऑपरेटिंग सिस्टिम वापरतात. यामध्ये सॅमसंगच्या Galaxy A51 ने विक्रीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications